८ (टूडे १ साठी)
-rat२१p१२.jpg-
P२४M८४९५७
लांजा ः लांजा बस स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे.
----------
लांजा बसस्थानकाचा कायापालट
नुतनीकरणाचे काम गतीने ; ३ कोटी ३० लाखांचा निधी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २१ ः काही वर्षे रखडलेल्या दुर्लक्षित लांजा एसटी बस स्थानकाचा कायापालट होत असून एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काँक्रिटीकरण आणि सुसज्ज इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. काँक्रिटीकरण एक कोटी आठ लाख आणि इमारतीसाठी सुमारे दीड कोटींच्या निधीतून लांजा एसटी बसस्थानकाचे काम सुरू आहे.
एसटी बस स्थानकाच्या नुतनीकरणाच्या कामामुळे एसटी फेऱ्या लांजा हायस्कूल येथील पटागंणातून सुटत आहेत. मात्र हायटेक लांजा बस स्थानकाचे नियोजित आराखडा बारगळला असून केवळ दीड कोटी रुपयांची ही नवीन इमारत होत आहे. एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात ६०० कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. लांजा बस स्थानकासाठी हायटेक आराखडा तयार करण्यात आला होता. काही वर्षापूर्वी फौंडेशन कामाला सुरवात झाली होती. मात्र अपुऱ्या निधीमुळे हायटेक बस स्थानकाचे काम थांबले होते. आता जुनी इमारत, जुने कॅन्टीन हा भाग मोडीत काढून नवीन इमारत दीड कोटींची आहे. यात व्यापारी गाळे आहेत. उपहारगृह, आरक्षण खिडकी, बस स्थानक प्रमुख कार्यालय आदी सुविधा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.