कोकण

तळवडे, नेमळेवासीयांचे सावंतवाडीत उपोषण

CD

84978

तळवडे, नेमळेवासीयांचे सावंतवाडीत उपोषण

रस्ताकामासाठी आक्रमक ः बांधकाम विभागाकडून पूर्णत्वाचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः तळवडे, नेमळे रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करा, या मागणीसाठी तळवडे, नेमळे ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर उपोषण छेडले. जोपर्यंत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा श्री. राऊळ यांनी यावेळी दिला. दरम्यान, ३१ मे पूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
तळवडे, नेमळे या रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाला गेल्यावर्षी १५ मे नंतर सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी पावसामुळे ते काम अर्धवट ठेवले होते. त्यानंतर ग्रामस्थांच्या सततच्या तक्रारीनंतर पुन्हा गणेशोत्सवात रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविले होते. त्यानंतर पुन्हा ग्रामस्थांच्या सततच्या तक्रारीनंतर कामाला सुरुवात करण्यात आली; परंतु २ महिन्यांपासून ते काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम झाले नाही तर त्या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी तळवडे, नेमळेवासीयांनी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासमोर श्री. राऊळ यांच्या नेतृत्वाखाली उपोषण छेडले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असाही इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. यावेळी नेमळे सरपंच दीपिका भैरे, अनिल जाधव, आपा परब, विलास परब, रवींद्र सावंत, प्रशांत बुगडे, आनंद बुगडे, हरी परब, साईप्रसाद परब, नारायण परब, वामन परब, जगदीश परब, दिगंबर परब, सचिन मुळीक, नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ, दिलीप भैरे, मिलिंद नेमळेकर, एकनाथ राऊळ, रमेश गावडे, सिद्धेश नेमळेकर, रमाकांत गावडे आदी उपोषणाला बसले होते. दरम्यान, दुपारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक कार्यालयाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. त्यात त्यांनी ३१ मे पूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT