84984
ओरोस इंग्लिश स्कूलचा
९९.०१ टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा फेब्रुवारी २०२४ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल प्रशालेने नेत्रदीपक यश संपादन केले. प्रशालेचे २०४ पैकी २०२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.०१ टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला.
यात समृद्धी गावडे (८३.१७), प्रतीक परब (७८.३३), प्रसाद पालव (७७.८३) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.२७ टक्के लागला. या विभागात प्रथम योगिता पांचाळ (८४.८३), द्वितीय पूनम परब (८० टक्के), तृतीय श्रेयश कांबळे (७६.८३ टक्के) यांनी यश मिळविले. कला शाखा विभागाचा ९७.८२ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये सोनल मेस्त्री (६१.१७), कविता बावकर (६०.१७), युवराज कसालकर (५८.३३) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आनंद सावंत, सचिव यशवंत परब, प्रभाकर सावंत व विश्वस्त तसेच शाळा समिती अध्यक्ष नवीन बांदेकर, अवधूत मालणकर, मुख्याध्यापक उत्तम मळगांवकर आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.