२५ (पान ४ साठी)
अभ्यंकर महाविद्यालयाचा
निकाल ९८.१३ टक्के
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाने १२ बोर्डाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदा एचएससी मार्च २०२४ चा निकाल ९८.१३ टक्के लागला आहे. त्यामध्ये कला शाखा ९५.२२ टक्के, वाणिज्य १०० टक्के, विज्ञान शाखा ९८.०३ टक्के तर एमसीव्हीसी विभाग १०० टक्के निकाल लागला आहे.
बारवी बोर्डाच्या परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजयराव साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनिल गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर व सर्व विभाग प्रमुख, संस्था पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रथम क्रमांक संचिता अजय लिंगायत (९२.८३ टक्के), द्वितीय पूजा नरेंद्र कानिट (९२.६७ टक्के), तृतीय क्रमांक स्वरांगी मंदार जायदे (९२.१७ टक्के). वाणिज्य शाखा- तृषा संदिप चितळे (९७.०० टक्के), श्रावणी गणेश उकिडवे (९६.८३ टक्के), रिया राजेंद्र मुर्के (९६.६७ टक्के). विज्ञान शाखा ओंकार गणपत घडशी (९४.६७ टक्के), धनिष्ठा गिरीश शेवडे (९४.५० टक्के), श्रेया सागर कदम (९४.१७ टक्के). एमसीव्हीसी विभाग समृध्दी संजय हर्डीकर (९१.८३ टक्के), कश्मीरा विनोद पुसाळकर (८८.३३ टक्के), सार्थक राजेंद्र सावंत (८८.०० टक्के). तसेच विविध विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त केलेल्यांमध्ये पंधरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मानसशास्त्र संचिता अजय लिंगायत, संस्कृत - संजय मोरे, मनाली मनी घैसास, श्रावणी गणेश उकिडवे, पायल उदय गाडी, पुर्वा शंकर जाधव, रिया राजेंद्र भुर्के, अतुल बडे, तनिष्का सुनिल पवार, विशाखा दिलीप मुळये, दिप्ती हितेंद्र पटेल. अकाउंटस् - श्रावणी गणेश उकिडवे, गणित - ओंकार गणपत घडशी, जाबिर लुकमन सोकर. इलेक्ट्रॉनिक्स - ध्रुव गौतम बाष्टे, कण्व दिनेश देवळेकर यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.