एसआयएलसी लोगो घेणे
‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’द्वारे घडवा करिअर
ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी कोल्हापुरात मोफत कार्यशाळा
कोल्हापूर, ता. २१ : कृषी व इतर कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर अर्थात ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करणारी तसेच नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देणारा तसेच यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणाऱ्या ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या १ वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाविषयी व त्यासाठीच्या प्रवेशासंदर्भात कृषी व इतर क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळा गुरुवारी (ता. २३) कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात आयोजिली आहे.
गेल्या १० वर्षांपासून हा अभ्यासक्रम पुण्यात सकाळ माध्यम समूहाच्या कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसीतर्फे चालविला जात असून अनेक तरुणांनी या अभ्यासक्रमाद्वारे कृषी क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे तर अनेकांना ॲग्रीकल्चर इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीदेखील मिळाल्या आहेत.
कार्यशाळेत अभ्यासक्रमाचे स्वरूप, कालावधी, विषय, शुल्क तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन होईल. यात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
चौकट
कार्यशाळा वार आणि तारीख ः गुरुवार, २३ मे २०२४
वेळ ः दुपारी ३ वाजता
स्थळ ः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिराजवळ, कोल्हापूर
नावनोंदणीसाठी संपर्क ः ९८८१०९९४२६ किंवा ८७८८८३०१४१
सेंद्रिय खतनिर्मिती व वापर याविषयी मार्गदर्शन
कोल्हापूर, ता. २१ : शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर मर्यादित करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास जमिनीची उत्पादनक्षमता वाढते, मातीच्या कणांची रचना दाणेदार होते, जमिनीची जलधारण शक्ती वाढते, निचरा चांगला होतो व हवा खेळती राहते. तसेच रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणामावर मात करता येते. रासायनिक खतांच्या किमती ही वाढल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. म्हणून सेंद्रिय खते तयार करण्यास शिकवणारी व त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) कोल्हापूर येथे होणार आहे. कार्यशाळेत नैसर्गिक शेतीमधील निविष्ठा, गोआधारित निविष्ठा, नैसर्गिक खत व्यवस्थापन, वनस्पतीपासून तयार करण्यात येणारी जैविक कीटकनाशके तयार करण्याची पद्धत, घरगुती बुरशीनाशके, चंद्र व सूर्याच्या कलेनुसार घेतले जाणारे सेंद्रिय उत्पादन व फवारण्यांचे नियोजन, बायोडायनामिक शेती पद्धती, सेंद्रिय शेतीमधील कीड नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या सापळ्यांचा अभ्यास, परमा कल्चर शेती तंत्रज्ञान आदींबाबत मार्गदर्शन होईल.
चौकट
कार्यशाळेत पुढील सेंद्रिय निविष्ठा प्रात्यक्षिकासह शिकवल्या जातील :
जीवामृत, घन जीवामृत, गार्बेज एन्झाइम, फर्मेंटेड फ्रूट ज्यूस, मुट्टई रस्सम, फिश अमिनो ॲसिड, सप्तधान्यांकुर अर्क, लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया, गो कृपा अमृत, गांडूळखत, गांडूळपाणी, मासळीचे खत, हाडांचे खत, वेगवेगळ्या पेंडी, नॅडेप खत पद्धती, वर्मीफॉस, हिरवळीचे खत, झाडांच्या पानापासून व फुलांपासून खत, सिटी कंपोस्ट, कारखान्यांच्या मळीपासून खते, शेणापासून पीजीआर, तणापासून खत निर्मिती.
कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७.
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.