२७ (पान ५ साठीमेन)
-rat२१p१८.jpg-
२४M८४९९६
राजापूर ः खरवते येथे वीज पडून वीजमीटरचे झालेले नुकसान.
-rat२१p१९.jpg-
२४M८४९९७
राजापूर ः धाऊलवल्ली येथे रमेश पोकळे यांच्या घराचे छप्पर उडून झालेले नुकसान.
------------
राजापुरात पावसामुळे पडझड
खरवतेत वीज पडली ; धाऊलवल्लीतील घरावरील पत्रे उडाले, शेतकऱ्यांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट करीत सोमवारी (ता.२०) सायंकाळी पडलेल्या वळवाच्या पावसामध्ये खरवते येथे वीज पडली. यामध्ये घराची कौले, वीजमीटर जळण्यासह इलेक्ट्रीक साहित्य खराब झाले. मान्सून सूरू होण्यापूर्वी वीज पडण्याची यावर्षीची ही पहिली घटना घडली आहे. धाऊलवल्ली पोकळेवाडी येथे एका घराच्या छप्पराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. आंबा कलमाची झाडे मोडून आणि झाडावरून आंब्याची फळे पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यामध्ये सोमवारी जोरदार पाऊस पडला. यामध्ये पावसासोबत सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट सुरू होता. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडीत झाला. रात्री उशीरा वीजपुरवठा सुरळीत झाला. या पावसामध्ये खरवते गावठाणवाडी येथील झिमाजी कातकर यांच्या घरावर वीज पडली. सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू असताना ही वीज पडली. यावेळी घरामध्ये माणसे होती. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. घराच्या कौलाचे नुकसान झाले. त्याचवेळी घरातील वीजमीटर जळून इलेक्ट्रीक साहित्य खराब होवून नुकसान झाले आहे. धाऊलवल्ली पोकळेवाडी येथील रमेश पोकळे यांच्या घराला पावसासोबत सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये त्यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडून नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या नुकसानीचा त्या-त्या सजाच्या तलाठ्यांमार्फत पंचनामा करण्यात आला आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाचा अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या हापूस आंब्यालाही नुकसानीचा तडाखा बसला आहे. पाचल परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये आंबा कलमाची झाडे पडून आणि झाडावरील आंबा फळे पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी दादासाहेब झेंडे यांनी दिली. वळवाच्या पावसामध्ये पाचल व्यतिरीक्त तालुक्याच्या अन्य भागात कृषीसंबंधी झालेल्या नुकसानाची तत्काळ पाहणी करून त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.