२८ (पान ५ साठी)
-rat२१p१६.jpg-
२४M८४९९४
मैथिली भोपणे
-------------
मैथिली भोपणे मंडणगडात प्रथम
तालुक्याचा निकाल ९८.०६ टक्के ; सर्व मुली उत्तीर्ण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २१ ः तालुक्याचा निकाल ९८.०६ टक्के इतका लागला. तालुक्यातून या परीक्षेसाठी बसलेल्या ५१६ विद्यार्थी बसले होते. यातील ५०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार स्व. गोपीनाथ मुंडे कनिष्ठ महाविद्यालयातील मैथिली भोपणेने वाणिज्य शाखेत ८५ टक्के गुण मिळवून तीन विद्याशाखांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. सर्व विद्याशाखांमधून बसलेल्या सर्वच्या सर्व २४६ मुली परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.
देव्हारे कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला. अपेक्षा बाईत (६४.३३), वैभव वैराग (६३.१७), प्रतीक शिंदे (६०.८३), वाणिज्य शाखेतून क्रांतीक म्हाब्दी (७७.३३), शिवानी वैराग (७५.१७), भूमिका भागणे (७३.५०) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचा कला शाखेचा निकाल ९३.४२ टक्के लागला. त्यामध्ये अनिशा जाधव (७९.५०), कश्यप मांडलेकर (७५.३३), माधवी घाग (७३.१७), तर वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून पल्लवी शिगवण (७७.५०), सम्यक पवार (७६.५०), स्नेहल घाग (७६.१७), विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. त्यामध्ये साद जुवळे (७३.८३), मैथिली जाधव (७२.८३), यश साळवी (७१.००) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.
बाणकोट येथील जर्मन परकार महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल ९६.५५ टक्के लागला. त्यामध्ये शिफा मुल्ला (८१.३३), सुमैय्या परकार (७७.६७), निहान परकार (७६.३३) यांनी क्रमांक मिळवले.
गोपिनाथ मुंडे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.३६ टक्के लागला. प्रज्वल जाधव (७९.८३), शिवंम घाणेकर (६५), वफा रहाटविलकर (६२.५०) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. मैथिली भोपणे (८५), सरिन हसबुले (७४.३३), कीर्ती कदम (७३.६७) यांनी क्रमांक मिळवले. भोईटे महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल ९०.६२ टक्के लागला. रोहिणी वनगुले (८१.१७), रोशनी सोंडकर (७६.१७), गिरीजा दाभोळकर (६८.८३) यांनी क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. नंदिनी बेंडूक (६०.६७), संगीता मोरे (५७.८३), वैभवी जाधव (५५.१७) यांनी क्रमांक मिळवले. औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला. टेक्निकल सायन्सचे परीक्षेत तीन विद्यार्थी बसले होते. तिन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.