कोकण

खेडमधील आणखी ७ गावांना टँकरने पाणी

CD

पान ५

खेडमधील आणखी
७ गावांना टँकरने पाणी
खेड : मागील आठवड्यात तालुक्यातील ८ गावे ३५ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असतानाच आणखी ७ गावातील १५ वाड्यांची भर पडली आहे. तहानलेल्या गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही प्रशासनाकडे अवघे दोनच टँकर उपलब्ध आहेत. एक दिवसाआड ११९ फेऱ्यांद्वारे आतापर्यंत पाणी वितरित करण्यात आले आहे. अपुऱ्या टँकरमुळे प्रशासन मेटाकुटीस आले आहेत. एकीकडे शेतीच्या मशागतीची कामे सुरू असताना टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. तालुक्यात खवटी-खालची वरची धनगरवाडी, अस्तान -चाटव- धनगरवाडी, कशेडी बोरटोक, बंगला, थापेवाडी, सवणस, मूळगाव देऊळवाडी, नाभिकवाडी, वरचीवाडी, खालचीवाडी, चिरणी- धनगरवाडी, खोपी-अवकिरेवाडी, कळंबणी बुद्रुक -दंडवाडी आदी ठिकाणी पाण्याची झळ बसली होती. टँकरसाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केल्यानंतर सवणस येथील ३ वाड्या व खोपी येथील २ वाड्या वगळता अन्य ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाकडे ६ हजार लिटर क्षमतेचा एक व ५ हजार लिटर क्षमतेचा एक खासगी टँकर उपलब्ध आहे. सुकिवलीतील चोरद नदीपात्रातून तहानलेल्या गाव- वाड्यांना एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून टँकरने तब्बल ११९ फेऱ्या धावत आहेत.


खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके
खेड : पावसाळा काही दिवसांवर आला असताना नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. खेड येथील जगबुडी नदीकिनारी सोमवारी (ता. २०) आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. या वेळी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी व विसर्जन कट्टा पथकातील सदस्य उपस्थित होते. अतिवृष्टीत जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पुराचे पाणी बाजारपेठेत शिरते. या पुराच्या पाण्यात नदीकाठचे रहिवासी अडकून पडतात. अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते, प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली जगबुडी नदीपात्रात होडीच्या सहाय्याने प्रात्यक्षिके घेण्यात आली. पालिका आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी व विसर्जन कट्टा पथकातील सदस्यांना आपत्तीबाबतचे धडे देण्यात आले. जीवितहानीसह वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या उपाययोजनांचा अवलंब करायचा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT