कोकण

पेढांबेतील केळीच्या बागेचे आठ लाखाचे नुकसान

CD

३६ (पान ३ साठीमेन)


-ratchl२११.jpg-
२४M८५००४
चिपळूण ः वादळी पावसात कान्हे बौद्धवाडी येथील जयवंत जयराम मोहिते यांच्या घराचे नुकसान झाले.
-------------

केळीच्या बागेचे आठ लाखांचे नुकसान

पेढांबेत वादळी पावसाचा तडाखा ; आठ गावांना फटका, पंचनाम्याची प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. २१ ः तालुक्यातील पेढांबे येथील केळीच्या बागेचे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सुमारे आठ लाखाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पावसाने हिरावून घेतले आहे. यामध्ये बागायतदार संतोष शिंदे यांना मोठा फटका बसला आहे. सोमवारी (ता. २०) येथे झालेल्या पावसात काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले.
गेल्या आठवडाभरापासून येथे पावसाने धुमशान घातले. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक नुकसान झाले. त्यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. अजुनही काही ठिकाणी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या नुकसानीत आणखी वाढ होणार आहे. त्याव्यतिरिक्त महावितरणचेही ५१ लाखाचे नुकसान झाले आहे. अजुनही काही गावातील वाड्या अंधारात असून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. अशातच सोमवारी पुन्हा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात पूर्व विभागातील अलोरे, पिंपळी, नागावे, खेर्डी, खडपोली, सती, चिंचघरी, पेढांबे या भागात या वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. कान्हे बौद्धवाडी येथील जयवंत जयराम मोहिते यांच्या घराचे छत उडून गेले. त्यामुळे हे कुटुंब बेघर झाले आहे. याच पद्धतीने पूर्व विभागातील काही घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पेढांबे येथे मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये केळीचे पीक आडवे झाले आहे. संतोष शिंदे यांची केळीची बाग या पावसामध्ये जमिनदोस्त झाली. त्यांनी पाच एकरमध्ये २५ लाखांची केळी लागवड केली होती. येत्या महिनाभरात ही केळी चिपळूण बाजारपेठेत विक्रीस येणार होती. या वादळी वाऱ्यामुळे ही केळीची बाग जमिनदोस्त झाली. यामध्ये त्यांचे आठ लाखांचे नुकसान झाले असून आमदार शेखर निकम यांनी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष शिंदे यांची चौकशी केली व कृषी विभागाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT