कोकण

देवगडमध्ये मनस्वी बांदिवडेकर प्रथम

CD

85018

देवगडमध्ये मनस्वी बांदिवडेकर प्रथम

पंतवालावलकर विद्यालयाची विद्यार्थिनी ः तालुक्याचा निकाल ९७.१३ टक्के

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ ः येथील एन. एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९७.१३ टक्के लागला. मनस्वी विनायक बांदिवडेकर ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी ९२.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयाच्या चारही शाखांत सर्वप्रथम आली.
महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून परीक्षेला बसलेले सर्व १९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये अनुक्रमे ः वेदांती पिसे (८२.३३), मनस्वी नाईक (८०.३३), पद्मजा घाडी (७९.६६). कला शाखेतून परीक्षेला बसलेल्या १७७ पैकी १६० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९०.३९ टक्के लागला. यामध्ये अनुक्रमे, हर्ष जाधव (७८.५०), सुचिता मांजरेकर (७३.५०), सानिका गोईम (७०) पहिले तीन आले. वाणिज्य शाखेतून परीक्षेला बसलेल्या २१३ विद्यार्थ्यांपैकी २१२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९९.५३ टक्के लागला. यामध्ये अनुक्रमे, मनस्वी बांदिवडेकर (९२.५०), सोहम् मोंडकर (८८.१७), अलिमा खान (८६.३३) पहिले तीन आले.
एम.सी.व्ही.सी. मधून परीक्षेला बसलेले सर्व ४२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यामध्ये अनुक्रमे, कस्तुरी घाडी (८३.६७), सानिया कुळकर (८२.१७), अपूर्वा शिर्सेकर (७९.१७) पहिले तीन आले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्‍वर गोगटे उच्च माध्यमिक विद्यालयाचा (व्यवसाय अभ्यासक्रम) निकाल ७९.४१ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या ३४ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभागातून परीक्षेला बसलेल्या १८ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ७७.७७ टक्के लागला. यामध्ये अनुक्रमे, अभिषेक राऊळ (६५), प्रणव मोंडे (६०.५०), हितेश वायंगणकर (६०) पहिले तीन आले. इलेक्ट्रीकल्स् टेक्नॉलॉजी विभागातून परीक्षेला बसलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८१.२५ टक्के लागला. यामध्ये अनुक्रमे, गौरव राणे (६२), कौस्तुभ भोवर (५८.५०), किरण राऊत (५७.१७) पहिले तीन आले. येथील देवगड एज्युकेशन बोर्ड संचलित शेठ म. ग. हायस्कूलमधील वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेला बसलेले सर्व ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अनुक्रमे, श्रुती जोईल (७६.१७), कस्तुरी जोईल (७०.३३), अमिषा घाडी (६८.८३) हे विद्यार्थी पहिले तीन आले. शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के इतका लागला. परिक्षेला बसलेले सर्व १४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. यातून परीक्षेला बसलेले सर्व ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अनुक्रमे, सिध्दी सावळे (८८), कशीश घाडी (८२.६७), लावण्या पवार (८२) पहिले तीन आले. कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला. यातून परीक्षेला बसलेले सर्व ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अनुक्रमे, साईल मालंडकर (६०.५०), साक्षी मिठबांवकर (५८.८३), मंजली चव्हाण (५७.५०) पहिले तीन आले. मिठबांव येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेला बसलेले सर्व १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अनुक्रमे, साहिल हिंदळेकर (५५.५०), संदेश साईम (५५), पंचम बोरकर (६५.५०) पहिले तीन आले.
---
पडेल महाविद्यालयाचा ९६.८७ टक्के
परीक्षेला बसलेल्या ८१ पैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेला बसलेले सर्व ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अनुक्रमे, दिप्ती अनभवणे (७५.८३), आकांक्षा मासये (७०.६७), नेहा अनभवणे (६९.५०) पहिले तीन आले. तर कला शाखेचा निकाल ८८.२३ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या १७ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अनुक्रमे, सानिया घाडी (६४.६७), राज घाडी (५२.३३), केदार घाडी (५२.१७) पहिले तीन आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT