85030
नीरजा मांजरेकर वैभववाडीत प्रथम
तलुक्याचा निकाल १०० टक्के, ३१ विद्यार्थी विशेष श्रेणीत
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ ः तालुक्याचा फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. आर्चिणे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची नीरजा मांजरेकर (८६.१७) ही तालुक्यात प्रथम आली. रावराणे महाविद्यालयाचा प्रफुल्ल मोरे (८५.६७) द्वितीय तर याच महाविद्यालयाचा शुभम परब (८४.५०) हा तालुक्यात तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाला. तालुक्यातील ३१ विद्यार्थी विशेष श्रेणीत उतीर्ण झाले.
फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेला तालुक्यातील चार कनिष्ठ महाविद्यालयांतून ४०२ विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले. चारही कनिष्ठ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. तालुक्यातील ३१ विद्यार्थी विशेष श्रेणीत तर २२९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
(कै.) हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतून परीक्षेस बसलेले सर्व ५७ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात प्रथम क्रमांक यश शेळके (७७ टक्के), द्वितीय प्रीती सावंत (७६ टक्के), तृतीय क्रमांक रिया मोरे (७४.५० टक्के) हिने मिळविला. वाणिज्य शाखेतून १०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात अनुक्रमे प्रफुल्ल मोरे (८५.६७), शुभम परब (८४.५०), वैष्णवी करवंजे (८३.६७) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. विज्ञान शाखेतून १०० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यात हर्ष सुतार (८२.८३), हर्ष खाडे (८२.५०) व अक्षता चाळके (८१ टक्के) यांनी यश मिळविले.
आर्चिणे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेचे ७१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. यात नीरजा मांजरेकर (८६.१७), तन्वी कदम (७९.३३) व सानिया दळवी (७८ टक्के) यांनी क्रमांक पटकावले. वाणिज्य शाखेचे सर्व ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात सानिका कदम (८०.८३), सानिया रमदुल (७७.१७), आकांशा गुरव (७७ टक्के) यांनी यश मिळविले. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक नेले तिरवडे, महाविद्यालयातून शाखा कलेसाठी २२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. यात अनुक्रमे सोनल कुवळेकर (७८ टक्के), कृपा सावंत (७६.१७) व सानिका गुरव (६७ टक्के) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. वाणिज्य शाखेतील सरव ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम अपर्णा पांचाळ (६९.६७), द्वितीय सोनल काबंळे (६६.६७), तृतीय तन्वी गुरव (६७ टक्के) यांनी यश मिळविले. माधवराव पवार विद्यालय कोकिसरे महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून सर्व १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम क्रमांक सानिका राऊत (६७.६७), द्वितीय दिव्या सावंत (६५.६७) व मीर रावराणे (६५.६७), तृतीय क्रमांक रितेश गुरव (६० टक्के) याने मिळविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.