कोकण

ई शिधापत्रिका सुविधा

CD

१० (पान ३ साठी)

पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २१ : जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज खेडशी येथील विकास पवार यांना जिल्ह्यातील पहिली ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.
पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे कार्यक्षम वितरण होण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू केला आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह, रहिवासी आता सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी न घेता त्यांच्या रेशन कार्डसाठी सोयीस्करपणे अर्ज करू शकतात आणि प्राप्त करून घेवू शकतात. ई-शिधापत्रिकामध्ये विशिष्ठ क्युआर कोड दिला आहे. दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांची विशेष नोंद यामध्ये घेण्यात येणार आहे. शिधापत्रिकामध्ये नाव, कुटुंबाचा तपशील, पत्ता, रास्त धान्य दुकानाचा पत्ता, युनिट आदी माहिती नमूद केली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ई-शिधापत्रिकासाठी सेवानिहाय शुल्क निश्चित करण्यात आला आहे. अंत्योदय अथवा केशरी शिधापत्रिकासाठी अनुक्रमे २५ व ५० रुपये व शुभ्र शिधापत्रिकासाठी १०० रुपये ऑनलाईन शुल्क आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरीक्षक ऋषिकेश जाधव यांनी समन्यय अधिकारी म्हणून काम पहिले. यासाठी प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी रिद्धी गोरे यांनी मार्गदर्शन केले. पुरवठा निरीक्षक मनोज पवार व तांत्रिक सहाय्यक सारिका साळवी हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

Nagpur: वैद्यकीय पदवी घेणारी पत्नी मानसिक अस्थिर कशी; आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली

Nagpur: नवतपाच्या पहिल्याच दिवशी चटके; ब्रह्मपुरीचा पारा ४७.६ तर, नागपूर ४६.५ अंशांवर

Rwanda Economy: रवांडा : आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्था

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

SCROLL FOR NEXT