कोकण

जिल्ह्यात दोन वर्षे कमी, एक वर्ष जास्त पडतो पाऊस

CD

३५ (पान ३ साठी)

जिल्ह्यात दोन वर्षे कमी, एक वर्ष जास्त पाऊस

आपत्ती व्यवस्थापनाकडून नोंदणी ; गेल्या १३ वर्षातील परिस्थितीवरून अंदाज

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : गेल्या तेरा वर्षांत झालेल्या पावसावरून त्यामध्ये दरवर्षी बदलत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सलग दोन वर्षे सरासरीपेक्षा कमी, तर एक वर्षे अधिक पावसाची नोंद होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील पावसाच्या नोंदींवरून गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे यंदा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत हवामानामध्ये सातत्याने होत असलेले बदल धोक्याचा इशारा करणारे आहेत. तापमानात होणारी प्रचंड वाढ, हिवाळ्यात अतिअधिक वाटणारा गारठा आणि पावसाच्या पॅटर्नमध्ये दिसून येणारा बदल समोर येऊ लागला आहे. कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पर्जन्यमानात गेल्या काही वर्षांपासून झालेले कमी अधिक प्रमाण हे देखील चिंता वाढवणारे आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते हा बदल एका हंगामापुरता वाटत असला तरी अनेक वर्षांपासून होणाऱ्या बदलांचे ते परिणाम आहेत.
काही वर्षांपासून कोकणपट्ट्यात हे बदल दिसून येत आहे. येथील मान्सून आगमन आणि त्यातील सातत्यातील अनियमितपणा दरवेळी या हंगामात प्रकर्षाने दिसून येत आहे. २०११ ते २०२३ या या १२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी कमी-जास्त स्वरूपात आहे. जिल्ह्यात सरासरी साडेतीन ते चार हजार इतके पर्जन्यमान होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे यंदा पाऊस जास्त पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
------------
चौकट
२०११ पासून पडलेला पाऊस

२०११ साली एकूण ५०६४ मिलीमीटर, २०१२ साली एकूण ४१०५, २०१३ मध्ये एकूण ४,५८८ इतके जोरदार पर्जन्यमान झाले होते. पण पुढील दोन वर्षात त्यात घट झाली. २०१४ मध्ये तर सरासरी ३,३९३ मिमी, २०१५ मध्ये एकूण सरासरी २,५३९ इतके पर्जन्यमान झाले. त्यानंतर २०१६ व २०२१ पर्यंत प्रतीवर्षी सरासरी पर्जन्यमान दमदार स्वरूपात राहिले. पण पुढील २०२२ व गतवर्षी २०२३ या पावसाळी हंगामात पर्जन्यमानी सरासरी घसरलेली राहिली. २०२२ मध्ये एकूण सरासरी २९९०.८८ आणि २०२३ मध्ये एकूण सरासरी ३०३८.२९ पर्जन्यमान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Latest Jobs : काम न करता मिळणार 3.7 कोटी रुपये पगार? OpenAI ने आणली अशी नोकरी, जाणून मोठमोठ्या इंजीनियर्सचं डोकं चक्रावलय

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT