85037
बारावीच्या परीक्षेमध्ये
वेंगुर्लेत मुलीच अव्वल
राजकुमारी बगळे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २१ ः बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९८.३९ टक्के लागला. यात बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेच्या विज्ञान विभागाच्या राजकुमारी बगळे हिने ९०.८४ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तालुक्यात ७४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षीही तालुक्यात मुलींनीच बाजी मारली.
बा. म. गोगटे कनिष्ट महाविद्यालय शिरोडा विज्ञान शाखेच्या सानिका मोरजकर हिने ९०.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, बॅ खर्डेकर महाविद्यालय विज्ञान शाखेच्या सृष्टी मांजरेकर हिने ९०.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, बा. म. गोगटे कनिष्ट महाविद्यालय शिरोडा वाणिज्य शाखेच्या सानिका सावंत हिने ९०.१७ टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक तर बॅ खर्डेकर महाविद्यालय विज्ञान शाखेच्या वेदिका परब हिने ८८.५० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.
तालुक्यातील महाविद्यालयनिहाय निकाल असा : श्री देवी सातेरी हायस्कूल व (कै.) गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेत परीक्षेला बसलेल्या १२८ विद्यार्थ्यांमधून १२७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या महाविद्यालयाचा ९९.२१ टक्के निकाल लागला. श्रेया परब (८२), चैताली राऊळ (६९), नेहा गावडे (६६.१७). वाणिज्य शाखेत प्रांजली माडये (८५.३३), हर्षदा सावंत (७९), सुश्मिता राऊळ (७८.५०). स्वयंअर्थ सहाय्यीत विज्ञान शाखेत साक्षी चिटणीस (८४.१७), वैष्णवी धुरी (८३.६७), निशीता पडवळ (८०). बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील विज्ञान विभागात राजकुमारी हिंदुस्थानी, संजय बगळे (९०.८३), सृष्टी मांजरेकर (९०.३३), वेदिका परब (८८.५०). कला शाखेत दिव्या वेंगुर्लेकर (७२.८३), चैताली करंगूटकर (७१.८३), शंकर सारंग (७१.६७). वाणिज्य विभागात करिष्मा तावडे (७१.८३), अर्चना परब (६९.८३), सुहानी कोंडुसकर व जनार्दन सावंत (६९). व्यवसाय अभ्यासक्रम विभागात प्रथम मुस्कान दस्तगीर पटेल सासाबाल (७९.५०), विद्या कदम (७४.८३), वसंत मातोंडकर (७४.३३). पाटकर हायस्कूल आणि रा. सी. रेगे ज्युनियर कॉलेजचा १०० टक्के निकाल लागला. कला शाखेत सुजल गावडे (६२.१७), साहिल सावंत (६१), देवेश परब (५८.१७). वाणिज्य शाखेत अपूर्वा पेडणेकर (७०.६७), कृपा खोबरेकर (६९.१७), मयूरी आरोलकर (६८.८३). व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील सर्व २१ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात अनंत पवार (८५.८३), रिया डिचोलकर (७२), फॅल्सी रॉड्रिक्स (७०.१७). बा. म. गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा विद्यालयात परीक्षेला बसलेल्या २७६ विद्यार्थ्यांपैकी २७० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.८३ टक्के निकाल लागला. या विद्यालयाच्या विज्ञान शाखेतील सर्व ११९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात सानिका मोरजकर (९०.६७), हर्षाली मुळीक (८७.६७), सेजल भुबे (८७.५०). वाणिज्य शाखेतून सर्व ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात सानिका सावंत (९०.१७), हर्षिता शेंडेकर (७९.१७), रामचंद्र राऊत व फिरदोसजहा तैस (७९.१७). कला शाखेतून २७ पैकी २५ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात राजश्री राळकर (८७.१७), निलक्षी पेडणेकर (७६), वैभवी तांडेल (७२). व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील ५७ पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात सावली तावडे (८५.८३), मैथिली जोशी (८१.६७), साक्षी रेडकर (८१.५०).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.