Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

E-KYC Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे, पण e-KYC मुदत वाढवली जाणार नाही. नवीन लाभार्थी नोंदणीबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. पडताळणी मोहिमेनंतर ८० लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली.
Women beneficiaries checking their names after e-KYC verification update in Ladki Bahin Yojana, Maharashtra.

Women beneficiaries checking their names after e-KYC verification update in Ladki Bahin Yojana, Maharashtra.

esakal

Updated on

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना सुरू राहणार आहे, पण, ई-केवायसी (e-KYC) पडताळणीची मुदत वाढवण्याचा किंवा नवीन लाभार्थींची नोंदणी करण्याचा कोणताही विचार सध्या नाही. शासनाने राबवलेल्या पडताळणी मोहिमेनंतर, लाभार्थींच्या यादीतून ८० लाख नावे वगळण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com