कोकण

कणकवली तालुक्‍याचा ९८.१७ टक्‍के निकाल

CD

85045

कणकवली तालुक्‍याचा ९८.१७ टक्‍के निकाल

परेश मडव प्रथम, चिन्मय शेळके द्वितीय, विज्ञानी प्रभू तृतीय

कणकवली, ता.२१ : बारावी परीक्षेत कणकवली तालुक्‍याचा निकाल ९८.१७ टक्‍के लागला. यात कणकवली कॉलेज मधील परेश मडव (सायन्स) याने ९४.८३ टक्‍के गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला. कणकवली कॉलेजचाच चिन्मय दिलीप शेळके (कॉमर्स शाखा) याने ९२.६७ टक्‍के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कनेडी हायस्कूलची विज्ञानी प्रभू (विज्ञान) हिने ९२.३३ टक्‍के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
बारावी परीक्षेसाठी तालुक्‍यात २०३१ जणांनी नोंद केली. त्‍यातील प्रत्‍यक्ष २०२५ विद्यार्थी परीक्षेला बसले. तर १९८८ जण उत्तीर्ण झाले. यात विशेष प्राविण्य श्रेणीत २३०, प्रथम श्रेणीत ९५८, द्वितीय श्रेणीत ७११ अाणि पास श्रेणीत ८९ जण आहेत. तालुक्‍यातील कनिष्‍ठ महाविद्यालयांच्या निकालामध्ये एस. एम. ज्युनिअर कॉलेज कणकवलीमध्ये संचाली जयवंत डगरे ही तीनही विभागांमध्ये प्रथम आली. विज्ञान शाखेत झेविअर अॅग्नेल फर्नांडीस हा ७३.५० टक्के मिळवून द्वितीय आला. तर विज्ञान शाखेत अमेय अनिल मालप आणि आयुष शंकर दळवी यांनी प्रत्‍येकी ७०.५० टक्‍के गुण मिळविले. वाणिज्य विभागात प्रतिक प्रशांत राणे याने ७२.६७ टक्के तर सौरभ सुनिल तारी याने ७१.५० टक्के प्राप्त केले. कणकवली कॉलेज विज्ञान शाखेमध्ये परेश सतीश मडव याने ९४.८३ टक्‍के, निलम नामदेव गुरव हिने ९२ टक्‍के, कनिज फातिमा अन्सारी हिने ८९.१७ टक्‍के तर सुजल राजेंद्र मुंज हिने ८९.१७ टक्‍के गुण मिळविले. वाणिज्य शाखेमध्ये चिन्मय दिलीप शेळके याने ९२.६७ टक्‍के, प्राची संभाजी घाडीगांवकर ९० टक्‍के, सिद्धेश लवू पालव ९० टक्‍के, हर्ष नरसिंह पटेल याने ८७.१७ टक्‍के गुण मिळविले. कला शाखेमध्ये : साक्षी संतोष गांवकर ७९.६७ टक्‍के, सृष्टी अतुल शेटये ७६.६७ टक्‍के, वेदांत भालचंद्र नरसाळे ७१ टक्‍के गुण मिळविले. ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडीमध्ये विज्ञान शाखेत विज्ञानी राजेश प्रभू ९२.३३ टक्‍के, कल्याणी दिलीप भोये ८८.५० टक्‍के. स्वरा रमण बाणे ८५ टक्‍के. वाणिज्य शाखेत साक्षी सत्यवान गावकर ८९.१७ टक्‍के, यश संजय आचरेकर ८७.१७ टक्‍के, रिया रमाकांत सदडेकर ८६.८३ टक्‍के,
कला शाखेत निशिगंधा सुभाष कुबल ७४.५० टक्‍के, मानसी सूर्यकांत गावकर ७३.५० टक्‍के, तेजस चंद्रकांत चव्हाण ७३.१७ टक्‍के गुण पटकावले. आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शुभम तिवरेकर ८९ टक्‍के, आर्या मांजरेकर ८७.६७ टक्‍के, साईराज तावडे ८२.५० टक्‍के, सलोनी मुळीक ८१.६७ टक्‍के, हर्षाली सादये ८०.५० टक्‍के तर वाणिज्‍य शाखेत मंदिरा काणेकर ७१.८३ टक्‍के, जिनान शेख याने ७० टक्‍के आणि साहिल शेख याने ६९.८३ टक्‍के गुण मिळविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT