कोकण

पाग पॉवरहाऊस परिसरात पाणी साचण्याची धोका

CD

२२ (टुडे पान २ साठी)


-rat२२p११.jpg-
P२४M८५११२
चिपळूण शहरातील पाग पावर हाऊस परिसरात पाणी साचण्याची धोका आहे.
--------------
चिपळूण शहरात पाणी साचण्याचा धोका

पाग पॉवरहाऊस परिसरात नागरिकांना त्रास ; रस्त्याची उंची वाढवली

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : शहरातील पाग पॉवरहाऊस येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका आहे. पॉवरहाऊस येथे हायवेच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पालिकेने तसेच महामार्ग विभागाने या विषयाकडे लक्ष देऊन नागरिकांची गैसोय दूर करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुयोग चव्हाण यांनी केली आहे.
पाग पॉवरहाऊस येथे रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी तसेच दोन रस्ताच्या मधोमध व पागेकडे जाणारा सर्व्हिस रोड येथे थोडा जरी पाऊस पडला तरी येथे पाणी साचून राहाते. कारण येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाही. रस्त्याची उंची वाढवल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका आहे. पाऊस झाला त्यावेळी पावसाचे पाणी कृष्णेश्वर दर्शन या इमारतीच्या पार्किंगमध्ये आले होते. गेल्या वर्षी ही समस्या कायम होती. हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पालिकेला पत्रव्यवहार करण्यात आला. पालिकेने तात्पुरती व्यवस्था केली. मात्र यावर्षी पुन्हा पाणी भरण्याची भीती कायम आहे. यादव चाळ ते पॉवरहाऊस येथील असणारा नैसगिक पऱ्या पॉवरहाऊस येथे हायवेच्या दोन्ही बाजूने साफसफाई होणे आवश्यक आहे. नाहीतर पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचण्याची भीती आहे.
चिपळूण पोलिस ठाण्यावरून हायवेकडे येणारा मार्ग ज्या ठिकाणी जोडला आहे, तिथे मोठा चढ असल्यामुळे येणारी एसटी व अन्य वाहनांना हायवेवरील वाहनांचा कोणताही अंदाज येत नसल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सुयोग चव्हाण यांनी पालिकेकडे केली आहे.
-----
चौकट
सिग्नल यंत्रणा हवी
महामार्गावर पाग पॉवरहाऊस हायवे हे ठिकाण अपघात क्षेत्र झाले आहे. भरधाव येणाऱ्या वाहनामुळे येथील नागरिकांना रस्ता - ओलांडणेही कठीण झाले असून रोज नागरिक जीवाच्या बेतावरती रस्ता ओलांडत आहेत. तरी या ठिकाणी अद्ययावत सिंग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी. गोपाळकृष्णवाडी येथील नागरिकांची घरे महामार्गाच्या दोन्ही बाजूने आहेत. येथील जागृत देवस्थानाचे कार्यक्रम वर्षभर होत असतात. त्यामुळे येथील मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता क्रॉसिंगची व्यवस्था व्हावी.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा बळी..! पिंजरा लावण्याची राधाकिसन पठाडे यांची मागणी

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

SCROLL FOR NEXT