कोकण

चौधऱी ट्रस्ट, ''प्रगत'' संस्थेतर्फे वालावलकर कुटुंबीयांना मदत

CD

swt233.jpg
85343
वालावल ः येथील वालावलकर कुटुंबीयांना मदतीचा धनादेश देताना दयानंद चौधरी.

चौधऱी ट्रस्ट, ‘प्रगत’ संस्थेतर्फे
वालावलकर कुटुंबीयांना मदत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ः वालावल येथील अनंत वालावलकर यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सेवाभावी संस्था मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट, वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांमार्फत आर्थिक मदत देण्यात आली. चार महिन्यांपूर्वी वालावल ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले अनंत वालावलकर यांचा झाडाच्या फांद्या तोडत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, आई-वडील असून, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. याची दखल घेऊन चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग या संस्थामार्फत आर्थिक मदतीचा धनादेश वालावलकर यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर, कबड्डीपटू प्रीतम वालावलकर व वालावलकर कुटुंबीय उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT