कोकण

सावंतवाडी शहरातील धोकादायक झाड हटवा

CD

85344

सावंतवाडी शहरातील
धोकादायक झाड हटवा
राजू बेगः पालिकेस निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः शहरातील रस्त्यालगतचे धोकादायक असलेले झाड तत्काळ तोडावे, अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेग यांनी निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी पालिका हद्दीमध्ये माठेवाडा काझीदिंडी परिसरात वागळे दुकाननजिक मुंबई स्थित महम्मद रफिक काझी यांच्या मालकीच्या जागेत एक आंब्याचे झाड अत्यंत जीर्ण झाले आहे. हे झाड रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असल्याने ते तात्काळ तोडून घेण्याबाबत तेथील नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने त्यांच्या मागणीनुसार १५ जून २०२३ ला याबाबत अर्जाद्वारे पालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर झाडाचे मालक महम्मद काझी यांना ३ जुलै २०२३ च्या पत्राने पालिका प्रशासनाने कळविलेले होते; परंतु अद्यापपर्यंत या झाडाबाबत कोणतीच उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. आता पावसाळा तोंडावर आल्याने झाड मोडून अथवा कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे झाड मोडून जीवित व वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी नगरपालिका जबाबदार राहील, असा इशारा बेग यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT