कोकण

पावसाळ्यातील आपत्तींबाबत तातडीने उपाययोजना करा

CD

पावसाळ्यातील आपत्तींबाबत
तातडीने उपाययोजना करा
राजेंद्र पेडणेकरः प्रशासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २३ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात आपत्तीच्या घटना घडतात. यंदाच्या पावसाळ्यात या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात दरड कोसळणे, पूर येणे, झाडे पडणे, विद्युत खांब व तारा तुटणे यांसह अन्य आपत्तीच्या घटना घडतात. या घटना घडू नयेत, म्हणून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. दरड दुर्घटना टाळण्यासाठी संभाव्य ठिकाणांची संबंधित यंत्रणेने पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. वर्षा पर्यटनासाठी पर्यटक जिल्ह्यात येतात. पर्यटकांना पर्यटनस्थळी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून, पर्यटन स्थळापर्यंत जाणारे मार्ग सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात येणारे घाटमार्ग, रेल्वे रुळांच्या आसपासच्या परिसरातील डोंगर, टेकड्या, दुर्गम भागातील विविध वस्ती वाड्यांतील दरड कोसळण्याचे धोके असलेली ठिकाणे पावसाळ्यापूर्वीच हेरून तेथे दरड कोसळू नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात. आपत्ती ओढवल्यास तत्काळ मदतकार्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT