कोकण

जिल्ह्यातील भूजल पातळी खालावलेली

CD

२० (टूडे २ साठी)

जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली

अनेक गावात पाणीटंचाई ; वळवाचा पावसाचा टंचाईवर उतारा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः गतवर्षी कोकणात जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि त्यानंतरच्या परतीची सरीही अत्यल्प होती. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. मार्चअखेरीस घेतलेल्या नमुन्यांमध्ये जिल्ह्यात भूजल पातळी खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वळवाच्या पावसामुळे धरण, विहिरींची पातळी वाढेल आणि टंचाईची तिव्रता कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत कोकणावर वरुणराजा नेहमीच संतुष्ट राहिला आहे. गेल्या काही वर्षांपासून इथले पावसाचे स्वरुप काहीसे विस्कळीत झाले आहे. कोरड्या दिवसांचा कालखंड वाढला आहे. मागील हंगामात कोकणात पावसाच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत तब्बल ८०० ते १००० मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली. सरासरी पावसाचे प्रमाण थोडे जास्तच असल्यामुळे ‘दुष्काळी’ म्हणावी अशी परिस्थिती कोकणात नाही. पण पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे स्वरूप यंदा गंभीर बनत चालले आहे. बहुसंख्य गावांनी एक दिवसाआड पाणी पुरवण्याचे नियोजन सुरू केले. काही जलस्त्रोत आता आटू लागल्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागात टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गंभीरतेचे मुख्य कारण, मोसमात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत भूजलाची पातळी आणखी कमी झाली आहे. त्या दृष्टीने तीन जिल्ह्यांपैकी सर्वात डोंगराळ आणि म्हणून जास्त पावसाच्या रत्नागिरी जिल्ह्यातली परिस्थिती नमुन्यादाखल बघितली तर मार्चअखेर जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांमधील भूजल पातळीची आकडेवारी पुढीलप्रमाणे दिसते ः मंडणगड ३.४० मीटर (गेल्या पाच वर्षांतील सरासरी ३.३४ मीटर), दापोली ४.६१ मी. (४.५१), खेड ४.०५ मी. (३.८९), गुहागर ७.९४ मी. (७.८३), चिपळूण ४.८१ मी. (४.७५), संगमेश्वर ७.०९ मी. (६.९६), रत्नागिरी ९.५१ मी. (९.१२), लांजा ८.७७ मी. (८.७१), राजापूर ६.६४ मी. (६.३२). मार्च महिन्याच्या तुलनेत या सर्व तालुक्यांमध्ये भूजल पातळी खाली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT