कोकण

होर्डिंग मालकांकडून नोटिशीकडे दुर्लक्ष

CD

होर्डिंग मालकांकडून नोटिशीकडे दुर्लक्ष

दापोली नगरपंचायत ; पुन्हा पाठविणार स्मरणपत्र
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २३ : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर जाग आलेल्या राज्य सरकारने अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचे आदेश दिले. परवानगी असलेल्या होर्डिंगचे स्टकचरल ऑडिट करून घेण्याचे आदेश नगरपालिकांना दिले. दापोली नगरपंचायतीने ज्यांच्या मालकीचे शहरात होर्डिंग आहेत त्यांना नोटिसा पाठवून उत्तर मागितले. मात्र अद्याप एकाही होर्डिंगमालकाने उत्तर दिले नसल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे.
दापोली शहरात उपजिल्हा रुग्णालय आवार, गोडावून आवार, दापोली तहसीलदार कार्यालय आवार येथे शासकीय योजनांची माहिती देणारे होर्डिंग असून केळसकर नाका येथे खासगी मालकीची ४ होर्डिंग आहेत. खासगी होर्डिंग मालकांना नगरपंचायतीकडून नटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही. त्यांना आज पुन्हा स्मरण पत्र पाठविण्यात येणार असून त्यालाही उत्तर न आल्यास पुन्हा दोन वेळा स्मरणपत्र पाठविण्यात येणार असून त्यालाही उत्तर न दिल्यास या होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी झालेला खर्च या होर्डिंग मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या होर्डिंगबाबत तहसील कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे का अशी विचारणा केली असता ते देण्यात आले नसल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT