कोकण

स्थानिक एसआयएलसी

CD

लोगो

सेंद्रिय खत निर्मिती व वापर याविषयी मार्गदर्शन
कोल्हापूर, ता. २३ : शेत जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर मर्यादित करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते, मातीच्या कणांची रचना दाणेदार होते, जमिनीची जलधारण शक्ती वाढते, निचरा चांगला होतो व हवा खेळती राहते. तसेच रासायनिक खतांमुळे होणाऱ्या दुष्परिणामावर मात करता येते. रासायनिक खतांच्‍या किमती ही वाढल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. म्हणून सेंद्रिय खते तयार करण्यास शिकवणारी व त्याचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) कोल्हापूर येथे होणार आहे. कार्यशाळेत नैसर्गिक शेतीमधील निविष्ठा, गोआधारित निविष्ठा, नैसर्गिक खत व्यवस्थापन, वनस्पतीपासून तयार करण्यात येणारी जैविक कीटकनाशके तयार करण्याची पद्धत, घरगुती बुरशीनाशके, चंद्र व सूर्याच्या कलेनुसार घेतले जाणारे सेंद्रिय उत्पादन व फवारण्यांचे नियोजन, बायोडायनामिक शेती पद्धती, सेंद्रिय शेतीमधील कीड नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या सापळ्यांचा अभ्यास, परमा कल्चर शेती तंत्रज्ञान आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.

कार्यशाळेत पुढील सेंद्रिय निविष्ठा प्रात्यक्षिकासह शिकवल्या जातील :
जीवामृत, घन जीवामृत, गार्बेज एन्झाइम, फर्मेंटेड फ्रूट ज्युस, मुट्टई रस्सम, फिश अमिनो ॲसिड, सप्तधान्यांकूर अर्क, लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया, गो-कृपा अमृत, गांडूळ खत, गांडूळ पाणी, मासळीचे खत, हाडांचे खत, वेगवेगळ्या पेंडी, नॅडेप खत पद्धती, वर्मिफॉस, हिरवळीचे खत, झाडांच्या पानांपासून व फुलांपासून खत, सिटी कंपोस्ट, कारखान्यांच्या मळीपासून खते, शेणापासून पीजीआर, तणापासून खत निर्मिती

कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७.
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT