कोकण

जंगली प्राण्यांकडून नुकसानापोटी 24 लाखांची भरपाई

CD

१२ (टूडे पान १ साठी)

नुकसानग्रस्तांना २४ लाखांची भरपाई

वन्य प्राण्यांचा हल्ला; जंगलतोडीने वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्टयात होत असलेल्या जंगल तोडीमुळे मोठ्याप्रमाणात जंगली प्राणी नागरी वस्तीत घुसून शेतीचे नुकसान करतात. पाळीव जनावरे, मनुष्य यांच्यावर हल्लेही करतात. यामध्ये मागील वर्षभरात सुमारे २४ लाखांची नुकसान भरपाई रत्नागिरी, राजापूर, लांजा व संगमेश्वर तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आली.
एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २४ दरम्यान चार तालुक्यांमध्ये जंगली प्राणी नागरी वस्तीत घुसून नुकसान करण्याच्या २२० हून अधिक घटना घडल्याच्या नोंदी वनविभागाकडे आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यातील काही भागांमध्ये होत असलेली जंगल तोड, वन्यप्राण्याच्या शिकारीमुळे भक्ष्याच्या शोधात हिंस्त्रप्राण्यांसह गवा, कालवीट सारखे प्राणी आता मानवी वस्तीच्या आसपास दिसून येऊ लागले आहेत. काळवीट, डुकर, गव्यासारखे प्राणी शेतींचे मोठ्याप्रमाणात नुकसान करीत आहेत. लांजा तालुक्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात सामुहिक शेती करणाऱ्‍या गटांनाही या प्राण्यांमुळे भात शेतीचे नुकसान सोसावे लागत आहे. चार तालुक्यात पीक नुकसानीच्या ६० घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये सुमारे सहा लाखांहून अधिकची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, बिबट्यांकडून पाळीव प्राणी किंवा मनुष्यावर हल्ला होण्याची घटनाही वारंवार घडत आहेत. पाळीव प्राणी मारल्याच्या तब्बल १६० घटना वनविभागाकडे नोंदवल्या गेल्या. त्यांना सुमारे १५ लाख ६७ हजार १३ रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्‍यांना देण्यात आली आहे.

---
बिबट्याच्या हल्ला

शहराजवळील गावांमध्येही बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. घरांच्या अंगणामध्ये येऊन कुत्र्यांना पकडून नेल्याचे प्रकारही सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. राजापूर शहराकडे जाणाऱ्‍या रस्त्यावरच गतवर्षी बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. मनुष्यावर हल्ला केल्याची एकच घटना चार तालुक्यात घडली आहे. या प्रकारातील जखमी व्यक्तीला १ लाख २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. भक्ष्याच्या शोधात येऊन विहीरीत पडलेल्या अनेक बिबट्यांना वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जंगलात सोडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT