कोकण

जादा रेल्वे लोकल गाड्या चालू करा

CD

२१ (पान ४ साठी)

जादा रेल्वे लोकल गाड्या चालू करा

शौकत मुकादम ः चिपळुणात सुपरफास्ट गाड्यांना थांबा हवा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः कोकण रेल्वे मार्गावर लोकल गाड्या कमी असल्यामुळे प्रवाशांची झुंबड उडाली आहे. प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. शौचालयापासून पायरीपर्यंत प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर जादाच्या लोकल गाड्या चालवणे आवश्यक आहे. त्या जादा गाड्या तत्काळ सुरू कराव्यात अशी मागणी कोकण रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
शौकत मुकादम यांच्या मागणीनुसार कोरोनापूर्वी अंजनी, कामथे येथे लोकल गाड्यांना थांबे होते. ते आता बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. चिपळूण रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्मवर जे नंबर टाकण्यात आले आहेत, त्या नंबरवर रेल्वेचे डबे थांबत नसून चुकीच्या नंबरावर मागे पुढे थांबत असल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची धावपळ होते. चाकरमानी कोकणातून मुंबईकडे जात असताना हापूस आंबे, फणस व तांदूळ घेवून जातात. परंतु त्या-त्या प्लॅटफॉर्मवर त्या-त्या नंबराचे रेल्वेचे डबे मागे पुढे थांबत असल्यामुळे प्रवाशांना ओझे घेऊन इकडे तिकडे धावपळ करावी लागत आहे. सध्या रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. त्यासाठी जादाच्या लोकल गाड्या चालू कराव्यात. चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर वंदे भारतसह चार सुपरफास्ट गाड्यांना तातडीने थांबा देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे रेल्वे आर.पी.एफ. पोलिसांना स्वतंत्र फोर-व्हीलर गाडीच नाही. रेल्वे स्टेशनवर पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरेही उपलब्ध नाहीत. एखाद्या प्रवाशाला गाडीच्या वेळेविषयी माहिती घ्यायची असेल तर लँडलाईन फोनची आवश्यकता आहे. ग्रामीण भागामध्ये रेंज नसल्यामुळे मोबाईलवर गाडीची वेळ समजत नाही. या त्रृटी दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी श्री. मुकादम यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT