कोकण

वीज वाहिन्यांवर झाड कोसळून कोकीसरेत विजपुरवठा खंडित

CD

85491

झाड पडल्याने कोकीसरेत
वीजपुरवठा खंडित
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २३ः तालुक्यातील कोकीसरे माधवराव पवार विद्यालयाच्या नजीक असलेलं गुलमोहराचे झाड आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वीज वाहिन्यांवर पडले. वीज वाहिन्या तुटून वीजेचा खांबही वाकला. या परिसरातील वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित होता.
तालुक्यात गेले काही दिवस मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे.
सायंकाळच्या सत्रात विजांच्या गडगडाटासह नेहमी पाऊस बरसत आहे. आज पावसाने विश्रांती घेतली. मात्र, दुपारी झालेल्या वादळाने कोकीसरे माधवराव पवार विद्यालयाच्या समोर असलेले गुलमोहराच झाड वीज वाहिन्यांवर पडले. यामुळे वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या. या घटनेमुळे खांबलवाडीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या दुर्घटनेत वीज खांबही पुर्णतः वाकला गेला. या घटनेनंतर या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व वीज वितरणाचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील झाड बाजूला केले. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

SCROLL FOR NEXT