कोकण

उभादांडा येथे आज धार्मिक कार्यक्रम

CD

उभादांडा येथे आज
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्लेः उभादांडा-वाघेश्वरवाडी येथील श्री देव वाघेश्वर देवस्थानचा कलशारोहण प्रथम वर्धापन दिन उद्या (ता. ३०) साजरा होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ७ वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.
-----------
मासुरे येथे उद्या
‘वज्रांगंधारी गिरीधर’
वेंगुर्लेः परबवाडा-मासुरे येथील जुने घर ब्राह्मण मंदिराचा वार्षिक वर्धापन दिन सोहळा (ता. ३१) होणार आहे. यानिमित्त देवतेस केळी, नारळ अर्पण करणे, सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, रात्री ९ वाजता दत्तमाऊली नाट्य मंडळाचा ‘वज्रांगंधारी गिरीधर’ दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
--------------
तुतारी एक्स्प्रेस
धावणार ठाणेपर्यंत
कणकवलीः सीएसएमटी रेल्वेस्टेशन येथे काही महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस (११००४) ही गाडी १ जूनपर्यंत ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे. प्रवाशांनीही याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे केले आहे.
--------------
गौतम बुध्द जयंती
कासार्डेत उत्साहात
कणकवलीः भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा कासार्डे तसेच कासार्डे बौद्ध विकास मंडळ यांच्यावतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती कासार्डे येथील बुद्धविहार येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गावशाखेचे अध्यक्ष संदीप जाधव, महिला अध्यक्षा मनीषा जाधव यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्रिसरण, पूजापाठ घेऊन मग धम्मरॅली काढण्यात आली. सायंकाळी जाहीर सभेला कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत सदस्य विजय राणे, श्वेता चव्हाण, चव्हाण गुरुजी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व केंद्रीय शिक्षक आनंद कासार्डेकर, हिशेब तपासणीस भाऊ कासार्डेकर, रजनी कासार्डेकर आदी उपस्थित होते सेक्रेटरी अनिकेत जाधव यांनी संचलन केले. रात्री बुद्ध, भीमगीतांची जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा झाली. यावेळी विश्वास जाधव, महेंद्र जाधव, अशोक जाधव, अर्चना जाधव, सुनीता जाधव, रेश्मा जाधव, राकेश जाधव, अजित जाधव, मंगेश जाधव, संजय जाधव, भाई जाधव आदी उपस्थित होते.
--------------
वेतोरे येथे आज
दशावतारी नाटक
वेंगुर्लेः वेतोरे-पालकरवाडी मित्रमंडळातर्फे उद्या (ता. ३०) रात्री ८.३० वाजता श्री देवी महालक्ष्मी मंदिर, पालकरवाडी येथील रंगमंचावर बाल दशावतार नाट्यमंडळ, माड्याचीवाडी यांचे नाटक होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन पालकरवाडी मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील एसआयआर पूर्णपणे रद्द करावा आणि यापुढे मतदान बॅलेट पेपरवर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT