कोकण

जिल्हा रुग्णालयातर्फे नशामुक्तीचे धडे

CD

87167

जिल्हा रुग्णालयातर्फे नशामुक्तीचे धडे

‘तंबाखू नियंत्रण दिन’ : सिंधुदुर्गनगरीत विविध उपक्रमांना प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा, आरोग्य शिबिर, गटचर्चा घेण्यात आली. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सर्व जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये वर्षभरात ज्या व्यक्तीने तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याची इच्छा व्यक्त केली, त्यांचा सातत्याने सहा महिने पाठपुरावा घेऊन त्याला तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात आले. जिल्ह्यातील अशा १५४ जणांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ओरोस जिल्हा कारागृह येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. नशामुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍याम पाटील, डॉ. चिपळूणकर, डॉ. चेतना चुबे, डॉ. समीर धाकोरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे, नशामुक्ती महाराष्ट्र मंडळाच्या अर्पिता मुंबरकर, केतन कदम, श्रीम. बसावे, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे संदीप मोहोड, कार्मिस अल्मेडा, संतोष खानविलकर, रमेश पंडित, हर्षदा मुननकर व स्टाफ नर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संदीप मोहोड (सायकॉलॉजिस्ट) यांनी प्रस्तावना केली. कार्मिस अल्मेडा यांनी या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. नशामुक्तीबद्दल श्रीमती मुंबरकर यांनी माहिती दिली. तृप्ती जाधव यांनी आभार मानले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, ओरोसच्या वतीने मुलींच्या रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांचा निकाल असा ः चित्रकला स्पर्धा-गणेश पालव, केशव कुंभार, नेप्सन डिसोजा. निबंध स्पर्धा-संकेत मडव, राखी तांबे, साधनादेवी गौतम. रांगोळी स्पर्धा-आरती धुरी व साक्षी गावडे (संयुक्त), सावित्री पाटील, सुगंधी घाडीगावकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT