कोकण

कंत्राटी गेटमनचे वेतन त्वरित द्या

CD

87170

कंत्राटी गेटमनचे वेतन त्वरित द्या

केआरसी युनियन ः आंदोलन करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः ‘कोकण रेल्वेत कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या गेटमन कामगारांचे गेले दोन महिन्यांचे वेतन कंत्राटदाराने दिले नाही. यावर तत्काळ तोडगा न काढल्यास आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल. त्याची पूर्ण जबाबदारी कंत्राटदार व रेल्वे प्रशासन यांची राहील,’ असा इशारा चेअरमन तथा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूरचे व्यवस्थापकीय संचालक यांना केआरसी एम्प्लॉईज युनियन कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी पत्रकातून दिला आहे.
श्री. गाळवणकर यांनी पत्रकात म्हटले आहे, ‘कोकण रेल्वेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले गेटमन कामगारांचे दोन महिन्यांपासून वेतन झाले नाही. कोकण रेल्वे प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत कंत्राटी पद्धतीने गेटमनची नियुक्ती केली. या गेटमन पदावर काम करण्यासाठी मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. ही कंपनी कमी वेतनात कर्मचाऱ्यांना वापरून घेत असून, दोन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. काही कारणांमुळे कोकण रेल्वेने कंत्राटदार कंपनीला दंड केला होता. त्याचा राग कंत्राटदार कर्मचाऱ्यांवर काढत आहे. कोकण रेल्वेने दंड केलेली रक्कम कंत्राटदार या कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल करीत आहे. कर्मचाऱ्यांनी रक्कम न दिल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या कंत्राटदारामार्फत दिल्या जात आहेत. त्यांना काम करताना काही त्रास झाल्यास वैद्यकीय मदत किंवा उपचार मिळणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र जबरदस्तीने लिहून घेतले आहे. या सर्व बाबीवर कोकण रेल्वेने लक्ष द्यावे.’
............
चौकट
‘कंत्राटदारावर कारवाई करा’
‘गेटमन हे जबाबदारीचे पद आहे. याचा प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करता गेटमनने तणावमुक्त वातावरणात काम करणे आवश्यक आहे. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. कोकण रेल्वे प्रशासन आणि कंपनीच्या वादात कंत्राटी गेटमन भरडला जाऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. एकतर संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करून कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदार नेमावा; अन्यथा केंद्रीय कायद्याप्रमाणे हक्काचे वेतन या कर्मचाऱ्यांना द्यावे. यावर तोडगा न निघाल्यास पर्यायाने आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल. त्याची पूर्ण जबाबदारी कंत्राटदार व रेल्वे प्रशासनाची राहील,’ असे पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT