कोकण

बागायतदार चर्चासत्रास कोंडामा येथे प्रतिसाद

CD

87178

बागायतदार चर्चासत्रास
कोंडामा येथे प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ ः येथील आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघाच्यावतीने ‘हापूस ः संकट व संधी’ या विषयावर तालुक्यातील बागायतदारांना मार्गदर्शन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला बागायतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दाभोळे-कोंडामा येथील श्री बाळूमामा देवालयात कार्यक्रम झाला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक सतीश नेने, राजेश पटवर्धन, संघाचे अध्यक्ष विलास रुमडे, सचिव संकेत लब्दे, खजिनदार शुभम चौगुले आदी उपस्थित होते. सुरुवातीला दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. नेने यांनी रासायनिककडून नैसर्गिक व्यवस्थेकडे याअनुषंगाने मार्गदर्शन केले. आपण मार्गदर्शनासाठी अन्य वेळीही उपलब्ध असू, असे आश्वासन दिले. श्री. पटवर्धन यांनी झाडांची शास्त्रोक्त छाटणी कशी करावी व त्यापासून उत्पन्न कसे बदलते, याचे मार्गदर्शन केले. ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, त्यांनी संघाशी संपर्क करावा, असे आवाहन केले. श्री. मुंज व श्री. हेरवाडकर यांनी अनुक्रमे कीड व्यवस्थापन व वित्त व्यवस्थापन यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे कार्यकारिणी सभासद नाना गोडे आणि त्यांचे सहकारी समशेर खान, इंद्रनील कर्वे आदींनी मेहनत घेतली. संजय धुरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद परब यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT