कोकण

आंबेरकर कुटुंबियांना मदत

CD

आंबेरकर कुटुंबीयांना
कुसुमताई पतसंस्थेची मदत

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे आंबेरकरवाडी येथील महादेव शंकर आंबेरकर यांचे मच्छीमार बोट बुडून त्यात निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर संकट निर्माण झाल्यामुळे पावस येथील कुसुमताई पतसंस्थेतर्फे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी कुसुमताई पतसंस्थेचे शाखा अधिकारी नितीन गुळेकर, कर्मचारी अजय पानगले, गावडेआंबेरे सरपंच लक्ष्मण सारंग, माजी सरपंच रामचंद्र आंबेरकर, असलम काझी, जनार्दन सारंग, सुरेश सारंग वसंत नाटेकर आदी उपस्थित होते
---------

प्राचार्य मेहेंदळे यांचा
सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे प्राचार्य विकास माधव मेहेंदळे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. मार्गताम्हानेत महाविद्यालयात जुलै १९९३ सेवेत रुजू झालेले श्री. मेहेंदळे हे मुंबई विद्यापीठात इतिहास अभ्यास मंडळ सदस्य, कोकण इतिहास परिषद व इतिहास संकलन समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत आहेत. कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. संगीता काटकर, संस्थेचे संचालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
------------

आव्हाडाविरोधात
निषेध आंदोलन

साडवली ः देवरूख येथे भाजपने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून समस्त देशवासीयांचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध म्हणून देवरुख येथे भाजपतर्फे देवरुख येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर देवरूख पोलिस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून निवेदन देण्यात आले. तसेच आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी संगमेश्वर दक्षिण तालुकाध्यक्ष रुपेश कदम, देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळे, जिल्हा सदस्य सुधीर यशवंतराव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रथमेश धामणस्कर आदी उपस्थित होते.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT