कोकण

कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे

CD

कुवारबावला ज्येष्ठ नागरिकतर्फे
१५ जूनला जनजागृती मेळावा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. १ : समाजातील बदलांमुळे ज्येष्ठांच्या कौटुंबिक समस्या वाढत आहेत. त्या दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघामार्फत ज्येष्ठ नागरिक अवहेलना प्रतिबंधक जनजागृती दिवस १५ जूनला साजरा करण्यात येणार आहे. ज्येष्ठांच्या कल्याणकारी कायद्याचा प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध झाले आहेत. कुवारबाव परिसर संघाच्यावतीने १५ जूनला सायंकाळी ४ वा. कुवारबाव येथे ज्येष्ठ नागरिक भवनात जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात रत्नागिरी येथील मानवी हक्कांची जाणीव ठेवून सुमारे २४ वर्षे सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेतू या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष श्रद्धा कळंबटे या ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय देण्याच्यादृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे पोलिसखात्याच्या अधिकाऱ्यांनाही या वेळी मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने गाव तेथे नागरिक संघ स्थापनेची संकल्पना हाती घेतली आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी ग्रामीण स्तरापर्यंत राबवण्यात मोठी मदत होत आहे. जनजागृती मेळावा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी नसून ज्येष्ठांचे पाल्य, त्यांच्या सुना या कौटुंबिक घटकांबरोबरच समाजसेवक, शिक्षक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या यांनी सहभागी होऊन ज्येष्ठांच्या छळप्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारूती अंबरे, प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर कासेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT