कोकण

जगबुडी पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त होणे कठीण

CD

जगबुडी पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त करण्याचे आव्हान

केवळ एक जेसीबीद्वारे गाळ उपसा ; दिवसभरात तीनच तास काम

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १ : शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीतील गाळउपशाला अखेर सुरवात झाली आहे; मात्र या कामासाठी फक्त एक जेसीबी आणि तीन डंपर जलसंपदा विभागामार्फत वापरले जात आहेत. त्यामुळे जगबुडी नदीतील गाळ पावसाळ्यापूर्वी काढता येईल का? पाऊस सुरू झाल्यावर आता केलेला खर्च पुन्हा गाळ साचून वाया जाईल, अशी चर्चा सुरू आहे.
सीआरझेडची परवानगी तसेच इतर कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर जगबुडी नदीतील गाळ काढायला सुरवात झाली. भरती-ओहोटीची वेळ लक्षात घेऊन दिवसातून फक्त दोन ते तीनच तास गाळ काढण्याचे काम होत आहे. पावसाळ्यापर्यंत या पद्धतीने जर काम सुरू राहिलं तर जगबुडी नदी मोकळा श्वास कसा घेईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदीला पूर आल्यानंतर मच्छीमार्केट परिसरातून, शहरातून पाणी शिरते. या भागात जलसंपदा विभागाकडून गाळ काढण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर चिपळूणमधील वाशिष्ठी तर महाडमधील सावित्री नदीच्या गाळ काढण्याच्या कामाला तत्काळ गती मिळाली होती. त्यामुळे वाशिष्ठी नदीने गेल्याच वर्षी मोकळा श्वास घेतला. पात्र किमान दीड ते दोन मीटर खोल गेल्यामुळे गेल्या वर्षी चिपळूणला पुराचा तडाखा बसला नाही; मात्र जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरवात होण्यासच उशिरा झाला आहे.
------------

खासगी संस्थांची मदत आवश्यक
मान्सून कोकणच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे जगबुडी नदी गाळमुक्त करण्यासाठी सरकारने खासगी सेवाभावी संस्था, स्थानिक समाजसेवी संस्था यांना साद घालणे आवश्यक आहे. लोकसहभागातून जगबुडीच्या गाळमुक्तीसाठी एकवटण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT