कोकण

कुचेकर, भोसले यांचा कासार्डेत सत्कार

CD

87188

कुचेकर, भोसले यांचा कासार्डेत सत्कार

शिक्षकांचा पुढाकार ः निवृत्तीनिमित्त प्रशालेत सोहळा

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १ : कासार्डे हायस्कूलमधील शिक्षक म्हणजे हिऱ्याच्या खाणीतील निवडलेले अस्सल हिरे असतात. आमच्या शाळेची सर्वच क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. निवृत्त होत असलेले मुख्याध्यापक कुचेकर व पर्यवेक्षक भोसले यांनी शाळेसाठी दिलेले योगदान कधीच विसरले जाऊ शकत नाही, असे गौरवोद्‌गार कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्थानिक व्यवस्था समितीचे माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी कासार्डे विद्यालयात काढले.
कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. सी. कुचेकर व पर्यवेक्षक एस. डी. भोसले यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने विद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने विद्यालयात आयोजित सत्कार समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, संस्था पदाधिकारी व विद्यालयचे माजी प्राचार्य एम. डी. खाड्ये, सत्कारमूर्ती एन. सी. कुचेकर, संजय भोसले, सौ. अनिता कुचेकर, सौ. आशाताई भोसले, प्रभारी मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, कासार्डे सीनियर कॉलेजचे प्राचार्य मंदार नमसे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. बी. बिसुरे यांनी केले. ते म्हणाले, शिक्षक हा सामाजिक अभियंता असून शिक्षकांमुळेच अनेक संस्कारक्षम पिढ्या घडत आहेत. आनंद कासार्डेकर यांनी, कासार्डे शाळेचा आणि संस्थेचा नावलौकिक येथील गुणी शिक्षकांमुळेच वाढल्याचे सांगितले. संजय पाताडे यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या हातोटीमुळे कुचेकर सर प्रभावीसारख्या शिक्षकांमुळेच शाळा प्रगतीपथावर असल्याची भावना व्यक्त केली. माजी प्राचार्य एम. डी. खाड्ये, सीनियर कॉलेजचे प्राचार्य मंदार नमसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
............
चौकट
माजी विद्यार्थ्यांकडूनही सत्कार
कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एन. सी. कुचेकर व पर्यवेक्षक एस. डी. भोसले यांचा निवृत्तीच्या निमित्ताने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, सोन्याची अंगठी, पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. याशिवाय माजी विद्यार्थी, इतर मान्यवरांच्यावतीने सत्कारमूर्तींचे सत्कार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT