कोकण

रमेश कीर सोमवारी अर्ज भरण्याची शक्यता

CD

रमेश कीर उद्या अर्ज भरण्याची शक्यता

कोकण पदवीधर मतदार संघ ; ‘मनसे’मुळे महायुतीमध्ये गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ०१ : कोकण पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांची उमेदवारी जवळजळ निश्चित आहे. सोमवार ३ जूनला सकाळी ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला दिली जाणार देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले व आघाडीतील अन्य पक्षांचे नेते उपस्थित राहाणार आहेत. तरी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर व दापोली तालुका काँग्रेस सरचिटणीस मंगेश मोरे यांनी केले आहे.
महायुतीमधील घटकपक्ष ‘मनसे’ने आधीच उमेदवार कोकण पदवीधरमध्ये जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या विषयी भाजपमध्येच नाराजी असल्याने या निवडणुकीत कोकण पदवीधरला महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT