कोकण

मालवणात नाले सफाई संथ गतीने

CD

87241

मालवणात नाले सफाई संथ गतीने

नागरिकांत नाराजी ः शहरात पावसाचे पाणी तुंबण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : पावसाळ्यापूर्वी गटार खोदाई व ओढे, नाले, सफाई पूर्ण होणे गरजेचे असताना शहरात मात्र पावसाळा तोंडावर आला तरी गटार खोदाईचे काम संथ गतीने सुरू आहे. अद्यापही शहरातील अनेक भागांतील गटारे व नाल्यांची साफसफाई करण्याचे काम शिल्लक आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात २ ते ४ जून या कालावधीसाठी यलो अलर्ट जारी करीत मॉन्सूनचे आगमन ४ जूनला होणार असल्याची शक्यता वर्तविली असताना गटार खोदाई न झालेल्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवण पालिकेच्या गटार खोदाईच्या संथ कामगिरीवर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या गटार खोदाई व सफाईचे काम पालिकेकडून सुरू आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. या दृष्टीने मातीने बुझलेल्या व कचऱ्याने भरलेल्या गटारांची व नाल्यांची खोदाई व सफाई करणे आवश्यक आहे. जून उजाडला तरी पालिकेकडून गटार खोदाईचे काम सुरू आहे. शहरातील निम्म्यापेक्षा जास्त भागातील गटारांची सफाई करणे अद्याप बाकी आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असून, लवकरच कोकणात त्याचे आगमन होणार आहे. अशातच हवामान विभागाने २ ते ४ जून या कालावधीसाठी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. असे असताना शहरातील गटारांची खोदाई पूर्ण न झाल्याने मोठा पाऊस कोसळल्यास काही भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत; मात्र यातून पालिकेने कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. जूनपूर्वी गटारे व नाल्यांची खोदाई व सफाई होणे आवश्यक असताना शहरात अजूनही हे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT