कोकण

सुद्रिक निवृत्त होत असल्याची खंत

CD

87272

सुद्रिक निवृत्त होत असल्याची खंत

डॉ. सुनील लाड ः वनविभागात कामाचा वेगळा ठसा

‌कणकवली,ता. २ ः कृष्णा सुद्रिक यांनी आपल्या अनुभवातून आणि कौशल्याने वनविभागात काम करताना आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला. ते वनविभागाचा कणा आणि खंबीर पाया होते. ते निवृत्त होत असल्याची खंत जाणवत आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीतील सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांनी केले.
कणकवली तालुक्यातील दिगवळे वनपरीमंडळ येथील वनविभागाच्या कार्यालयात वनमजूर सुद्रीक यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात श्री. लाड बोलत होते. यावेळी कणकवलीचे प्रभारी वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, कडावलचे वनक्षेत्रपाल अमित कटके, रुक्मिनी कृष्णा सुद्रीक, व्ही.व्ही.मयेकर, शिवडावचे सरपंच नितिश भिसे, वनपाल सर्जेराव पाटील, वनपाल सारीक फकीर, शशिकांत साटम, वनरक्षक सिद्धार्थ, प्रतिराज शिंदे, अंजली सुतार, सुखदेव गळवे, नारायण शिर्के, संजय राणे, रुपेश गावडे, वृषाली सुद्रीक, गौरव सुद्रीक, सागर सुद्रीक, बालाजी तळेकर आदी उपस्थित होते.
डॉ. लाड म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सुद्रीक यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. आपल्या ३२ वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये प्रामाणिकपणे जंगल फिरती आणि जंगल संरक्षणाचे काम केले. नर्सरीमध्ये आपल्या प्रदीर्घ अनुभवातून आणि कौशल्यातून रोपवन केले आहे.’’ संदीप कुंभार म्हणाले, ‘‘वनक्षेत्रातील वनमजूर आमची संपत्ती आहे. सुद्रीक यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे सेवा केली. त्यामुळे निवृत्तीनंतर आम्हाला खंत वाटते. फिल्डवर काम करणारे वनमजूर म्हणून त्यांची उणीव भासेल. ते निवृत्त झाले तरी जेव्हा तुम्हाला त्यांच्या अनुभवाची आणि मदतीची गरज लागेल तेव्हा त्यांना बोलावून त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ वनरक्षकांनी घ्यावा.’’ यावेळी डॉ. लाड यांच्या हस्ते निवृत्त वनमजूर श्री सुद्रिक यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT