कोकण

पावस-मावळंगेत आंबा बागेला भीषण आग

CD

87306
87308
87307


मावळंगेत आंबा बागेला भीषण आग
दोन बागायतदारांना फटका; साडेसातशे कलमे खाक, लाखोंचे नुकसान
पावस, ता. २ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे लोहारवाडी परिसरातील हापूस आंब्याच्या बागेला आग लागल्याने सुमारे ७०० कलमांना आगीची झळ पोचली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन आंबा बागायतदारांचा समावेश आहे.
पावसजवळील मावळंगे-लोहारवाडी येथे भिकाजी तावडे यांची आंबा कलमांची बाग आहे. त्या बागेला शनिवारी (ता. १) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. दुपारी अडीच वाजता आंबा बागायतदार आणि ग्रामस्थांना आग लागल्याचे समजल्यानंतर त्यांनी बागेकडे धाव घेतली. बागेजवळ पोचेपर्यंत सुमारे ८०० आंबा कलमे आगीत भस्मसात झाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तासानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. तावडे यांच्या शेजारी असलेल्या प्रवीण गजने यांचीही ६० कलमे या आगीत खाक झाली.
हा परिसर कातळभाग असल्याने अनेक ठिकाणी गवत वाढले आहे. उष्णतेमुळे हे गवत सुकले आहे. त्यामुळे लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली. विद्युतवाहिन्या या परिसरात नसल्याने शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता नाही. त्यामुळे आग लागली कशी, असा प्रश्न बागायतदार तावडेसह ग्रामस्थांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

SCROLL FOR NEXT