कोकण

राजापूर-मान्सूनच्या संकेताने कॅनिंगचे भाव गडगडले

CD

८७३०९

मान्सूनच्या संकेताने
कॅनिंगचे भाव गडगडले
३५ रुपये किलो : अंतिम टप्प्यातील आंबा कॅनिंगला
राजापूर, ता. २ः हापूस पेटीच्या घसरलेल्या दरामुळे बाजारपेठेमध्ये आंब्याची पेटी पाठविणे बागायतदारांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झालेले असताना कॅनिंगच्या चांगल्या दराने हात दिला होता. मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत असताना कॅनिंगच्या दरामध्येही घसरण झाली आहे. ३८ वरून कॅनिंगचा दर ३५ रुपयांवर प्रतिकिलोवर आला आहे. घसरलेला दर आणि संपलेला मे महिना अशी स्थिती असली तरी, हंगामाच्या अंतिम टप्प्यातील उरलासुरलेला सरासरी पाच-दहा टक्के हापूस आंबा कॅनिंगला येत आहे.
प्रतिकूल वातावरणामुळे आधीच कमी उत्पादन, त्यामध्ये कमी दराची पडलेली भर यामुळे यावर्षीच्या हापूस आंब्याच्या हंगामामध्ये बागायतदारांसह व्यापाऱ्यांचे पुरते कंबरडे मोडून गेले. अंतिम टप्प्यामध्ये तर हापूस आंब्याच्या पेटीच्या दरामध्ये घसरण झाल्याने बागायतदारांनी आंब्याची पेटी मार्केटला पाठवण्याऐवजी कॅनिंगवर आंब्याची विक्री करण्याला अधिक पसंती दिल्याचे चित्र दिसले. त्यामध्ये कॅनिंगचा प्रतिकिलोचा दरही चांगला होता. त्यामुळे कॅनिंगच्या खरेदी-विक्रीमध्ये चांगली उलाढाल झाली. मे महिना संपला असला तरी उशिरा मोहोर येऊन उशिरा तयार झालेला सुमारे पाच ते दहा टक्के आंबा अद्यापही बागांमध्ये शिल्लक आहे. हा आंबा कॅनिंगला देण्यावर बागायतदारांचा भर आहे. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत आंबा कॅनिंगच्या दरामध्ये घसरण झाली आहे.
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हापूसच्या कॅनिंगचा ३८ रुपये प्रतिकिलो दर होता. घाऊक विक्री झाल्यास त्यामध्ये दोन-तीन रुपयांची वाढ होत होती; मात्र पावसाळा जवळ येऊ लागला आहे. त्याप्रमाणे कॅनिंगच्या दरामध्ये घसरण झाली आहे. त्यामध्ये ३८ रुपयांवरून कॅनिंगचा दर ३५ रुपयांवर आला आहे.

कोट
आंब्याची पेटी भरण्यापासून बाजारपेठेमध्ये पाठवण्यापर्यंत येणारा खर्च आणि मिळणारा पेटीचा दर यामध्ये कमालीची तफावत आढळते. अशा स्थितीत आंबापेटी पाठवणे डोईजड होते; मात्र कॅनिंगच्या चांगल्या दराची साथ मिळाली होती; मात्र तोही अंतिम टप्प्यामध्ये घसरला आहे. झाडावर शिल्लक असलेला आंबा वाया घालवण्यापेक्षा ना नफा ना तोटा या तत्त्वाप्रमाणे शिल्लक राहिलेला हापूस आहे त्या दराने कॅनिंगला देण्यावर भर दिला आहे.
- राजेश पाटील, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT