कोकण

दाभोळ-गुणवंत विद्यार्थ्यांचा दापोलीत सत्कार

CD

गुणवंत विद्यार्थ्यांचा दापोलीत सत्कार
दाभोळ, ता. ३ : दापोली येथील संतोषभाई मेहता फाउंडेशन आणि ब्रिलियंट अॅकॅडमी आयोजित दहावी परीक्षेत ७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार राधाकृष्ण मंदिरमध्ये करण्यात आला. या प्रसंगी दापोली व मंडणगड तालुक्यातील जवळजवळ १५० पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
या निमित्ताने दहावीनंतर पुढे काय व कोणत्या करिअर संधी उपलब्ध असणार आहेत याबद्दल संतोषभाई मेहता फाउंडेशनचे अध्यक्ष सुजय मेहता यांनी मार्गदर्शन केले. स्वप्ने साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेण्याची गरज असते, असा मोलाचा कानमंत्रही त्यांनी दिला तसेच ब्रिलियंट अॅकॅडमीचे डॉ. अजित भोसले यांनी मुलांना नीट व जेईई या परीक्षेबद्दल माहिती दिली.
विद्यार्थ्यांचे कौतुक व प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एक छोटीशी भेटवस्तू व अल्पोपाहार देण्यात आला. कार्यक्रमाला ज्ञानदीप संस्थेच्या अध्यक्षा सरोज मेहता, मेहता फाउंडेशनचे चेअरमन सुजय मेहता, मुख्याध्यापक मधुकर मोरे, सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रीतू मेहता, मेहता इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका चंदाली पारकर, ज्ञानदीप प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महेश शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

SCROLL FOR NEXT