कोकण

कंटेनर घुसला आरटीओ कार्यालयात

CD

87398
87399

कंटेनर घुसला आरटीओ कार्यालयात

पत्रादेवी तपासणी नाक्यावरील दुर्घटना; हॅन्डब्रेक न लावल्यामुळे अपघात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ ः कागदपत्रांच्या तपासणीसाठी उभा असलेला कंटेनर थेट आरटीओ कार्यालयात घुसल्याची घटना पत्रादेवी (गोवा) येथे घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यात नाक्याच्या चौकीसह दुचाकी आणि बाजूला असलेल्या मोटारीचे मात्र नुकसान झाले आहे. ही घटना काल दुपारी घडली. गाडीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी संबधित कंटेनर चालक गाडी उभी करुन निघून गेला. मात्र, तत्पुर्वी त्याने हॅन्डब्रेक लावला नसल्यामुळे हा अपघात घडला असे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल दुपारी हरियाणा येथील कंटेनर (एचआर ६९ सी ०६९९) तपासणीसाठी चालकाने पत्रादेवी गोवा येथील आरटीओ तपासणी नाक्यासमोर पार्क केला होता. चालक गाडीची कागदपत्रे घेऊन चौकीतील कार्यालयात गेला होता. मात्र, चालक हॅन्डब्रेक ओढण्यास विसरल्याने कंटेनर थेट चौकीत घुसला. यावेळी त्याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी श्री. गावकर व कर्मचारी यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने ते बचावलेत. मात्र, यामध्ये दुचाकी, मोटार व चौकीचे नुकसान झाले. याठिकाणी नेहमीच वाहनांची व लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. यापूर्वी देखील येथील तपासणी नाक्यावर अनेक अपघात झाले आहेत. काही वर्षांपूर्वी अबकारी खात्याच्या नाक्यावर कंटेनर कोसळल्याने दोन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १२ सप्टेंबर २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

SCROLL FOR NEXT