कोकण

रत्नागिरी-मास्टरमाईंड अनीचे सीमकार्डही दुसऱ्याच्या नावे

CD

मास्टरमाईंड अनीचे सीमकार्डही दुसऱ्याच्या नावे

आरजू टेक्सोल कंपनी फसवणूक; लोकेशन मिळविण्यात अडचणी

रत्नागिरी, ता. २ : आरजू टेक्सोल कंपनी मास्टरमाईंड अनी जाधव याने मोबाईलची सीमकार्डदेखील दुसऱ्याच्या नावावर घेतल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे त्याचे लोकेशन शोधण्यात पोलिसांच्यासमोर आव्हान बनले आहे.
मास्टरमाईंड अनी जाधव कंपनी स्थापनेपूर्वीच स्वत:ला वाचविण्यासाठी कंपनीच्या कागदोपत्री व्यवहारापासून दूर होता. एमआयडीसीमध्ये एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करताना गुंतवणुकीचा हा फंडा त्याने संशयितांना दिला; परंतु गुंतवणूकदारांना ज्या योजना दिल्या, परताव्याची हमी दिली ती कंपनी पूर्ण करू न शकल्याने ग्रामीण पोलिस ठाण्यात संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यामध्ये अनी जाधव याचा उल्लेख तक्रारदाराने केला आहे; परंतु कागदोपत्री अनी जाधव कंपनीवर कुठेच नाही. या प्रकरणी दोन संचालकांना पोलिसांनी अटक केली तेव्हा तपासामध्ये अनी जाधवच मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले.
पोलिसांना आपले लोकेशन मिळू नये यासाठी त्याने दुसऱ्याच्या नावे अनेक मोबाईल सीमकार्ड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांनाही अवघड होत आहे. मास्टरमाईंड असलेल्या अनी जाधव याने संचालकांऐवजी अन्य काही व्यक्तींवरही डिपॉझिटची रक्कम गोळा करण्याचे काम दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
आरजू टेक्सोलने गुंतवणूकदारांना विविध आमिषे देत स्वयंरोजगाराचे गाजर दाखवत फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीच्या विरोधातील तक्रारींचा ओघ वाढत असून हा आकडा दोन कोटींच्यावर गेला आहे. संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ झाल्याने आणखी काही महत्त्‍वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT