कोकण

खेड-खेडमधील सात वाड्यांच्या टॅंकरच्या मागणीकडे दुर्लक्ष

CD

खेडमधील सात वाड्यांच्या
टॅंकरच्या मागणीकडे दुर्लक्ष

दोनच टॅंकर उपलब्ध; टंचाईने ग्रामस्थांची वणवण

खेड, ता. २ : तालुक्यात पाणीटंचाईने कहर केला असून, १७ गावांतील ४४ वाड्यांमध्ये एक शासकीय व एक खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. तालुक्यातील आणखी सात वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली असून, येथील ग्रामस्थ अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाकडून दाखलाच प्राप्त न झाल्याने या वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. तालुक्यातील खोपी-अवकिरेवाडी, मानेवाडी, सवणस-मूळगाव, देऊळवाडी, नाभिकवाडी, वरचीवाडी, खालचीवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल करूनही अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्याची तसदी प्रशासनाने न घेतल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. एकीकडे रणरणत्या उन्हाने ग्रामस्थांना घाम फुटत असताना त्यात पाणीटंचाईचे चटके असह्य झाल्याने ग्रामस्थ हताश झाले आहेत. प्रशासनाकडे अजूनही अवघे दोनच टँकर उपलब्ध असल्याने तहानलेल्या गाववाड्यांना बऱ्याचवेळा टँकरची प्रतीक्षाही करावी लागत आहे.
-----------
चौकट
तुंबाडच्या दोन वाड्यांमध्ये पाणीटंचाईचा दाह
तुंबाड-कदमवाडी नं. २ व ओझरवाडी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी बहिरवली येथील सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांना साकडे घालत विंधन विहिरी खोदण्याची मागणी केली आहे. तुंबाड येथे शासनाची नळपाणी योजना असली, तरी फेब्रुवारी महिन्यापासूनच दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसू लागतात. दरम्यान, चौगुले यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन सादर करीत विंधन विहीर खोदून पाणीप्रश्न सोडवण्याची आग्रह मागणी केली आहे. खालिद चौगुले यांनी ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT