कोकण

विद्यार्थीदशेपासून र. ए. सोसायटीशी ऋणानुबंध

CD

- rat३p६.jpg-
P२४M८७४९३
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त प्रबंधक रवींद्र केतकर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. सोबत सायली केतकर.

विद्यार्थीदशेपासून र. ए. सोसायटीशी ऋणानुबंध

प्रबंधक केतकर ः सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : विद्यार्थीदशेपासूनच माझे या संस्थेशी ऋणानुबंध जुळले आहेत. संस्थेने सेवेची संधी दिली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, प्राचार्य यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडूनही आदर, प्रेम मिळाले. माझी पत्नी सायली केतकर हिने आणि माझ्या कुटुंबीयांनीही मोलाची साथ दिली, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रबंधक रवींद्र केतकर यांनी सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रमात केले.
केतकर आणि प्रयोगशाळा परिचर दीपक कुळ्ये हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या हस्ते, महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते केतकर आणि कुळ्ये यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, महेश सरदेसाई यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, दीपक कुळ्ये सपत्नीक उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नीलेश पाटील यांनी केले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT