कोकण

हर्णै-दापोलीत टंचाईची तीव्रता वाढली

CD

दापोलीत टंचाईची तीव्रता वाढली
२१ वाड्यांना टँकरने पाणी; दोनच टॅंकर असल्याने अडचण
हर्णै, ता. ३ः पाऊस लांबल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे दापोलीत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील १५ गावांतील २१ वाड्यांमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या गावांना २ टँकरने पाणी पुरवले जात आहे.
पाण्याची पातळी खालावल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टंचाईमुळे पाणी विक्रेते व टॅंकर मालक यांना सुगीचे दिवस आहेत. दापोलीतही पूर्व मोसमीच्या सरी कोसळल्या असल्या पण पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत आहे. पाऊस लांबला तर जलसंकट येईल, अशी परिस्थिती उद्भवली आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे, विहिरी, नळपाणी योजनेच्या विहिरींनी तळ गाठला. दापोली पंचायत समितीकडे अनेक ग्रामस्थांनी टँकरची मागणी केली असून, टँकर उपलब्ध करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. एक शासकीय आणि एक खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

चौकट
मान्सून वेशीवर आल्याने दिलासा
दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसात गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय वेधशाळेने व्यक्त केली आहे. सात जूनपासून कोकणात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मान्सूनने सोमवारी तीन जूनला कर्नाटक रायलसीमा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणाचा काही भाग व्यापला आहे. चार ते पाच दिवसात मान्सूनचे गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात आगमन होणार आहे. सात जूनपासून कोकणात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दापोलीकरांना टंचाईतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

SCROLL FOR NEXT