कोकण

तांबळडेग ग्रंथालयास २३० पुस्तके प्रदान

CD

87524

तांबळडेग ग्रंथालयास
२३० पुस्तके प्रदान

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः तालुक्यातील तांबळडेग येथील मुक्तद्वार सागर वाचनालयाला जीवबा रामचंद्र केळुसकर यांच्यातर्फे सुमारे २३० पुस्तके भेट देण्यात आली. जीवनात ग्रंथ हे आपले गुरु असल्याने जास्तीत जास्त वाचन करून तरुण पिढीने आपले जीवन समृद्ध करावे, असे आवाहन श्री. केळुसकर यांनी यावेळी केले.
यावेळी श्री. केळुसकर यांच्या हस्ते गावातील दहावी तसेच बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रभाकर राजम, विष्णू निवतकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. केळुसकर यांनी ग्रंथालयातील आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, कला आदी विविध क्षेत्रात गावातून अनेकजण मोठे झाले आहेत. यामध्ये ग्रंथालयाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रंथालय अध्यक्ष दिगंबर येरागी, उपाध्यक्ष प्रभाकर राजम, अंतर्गत हिशेब तपासणीस देवानंद केळुसकर, विष्णू धावडे, आनंद राजम, बाबुराव सनये, विष्णू निवतकर, वामन मोंडकर, पुष्पांजली केळुसकर, श्रीकृष्ण राजम, आप्पा येरागी, सुभान कोळंबकर, नाना कुबल, ग्रंथपाल भावना मालडकर, समृद्धी धुरी, रेश्मा शेटये आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT