कोकण

शिक्षक बदली प्रकिया पुन्हा राबवा

CD

शिक्षक बदली प्रकिया पुन्हा राबवा

संघाची मागणी ः आश्वासनाप्रमाणे बदल्या न झाल्याने फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः प्राथमिक शिक्षक संघटनांच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्ष समुपदेशनावेळी बदली प्रक्रिया राबविली गेलेली नाही. त्यामुळे बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांसह सर्व शिक्षक संघटनांची फसवणूक केली असून, याबाबत शिक्षक वर्गात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पुन्हा समुपदेशन प्रक्रिया राबवून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर आणि जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे यांच्याकडून यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, २० मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कक्षामध्ये सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांची सभा घेतली होती. त्यानंतर २१ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या; मात्र शिक्षणाधिकाऱ्यांच्या समक्ष बदल्यांसंदर्भात सविस्तर चर्चा होऊनही त्याप्रमाणे कार्यवाही झालेली नाही. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत रिक्त जागा व याद्या प्रासिद्ध न करताच अत्यंत घाईने समुपदेशन घेण्यात आले. प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने व कालावधी कमी असल्याच्या कारणास्तव सर्व इच्छुक बदली अर्ज केलेले शिक्षक २१ मे रोजी समुपदेशनासाठी उपस्थित राहिले. मुळात समुपदेशानासाठी लावलेले निकषच प्रसिद्ध न केल्यामुळे आयत्यावेळी अनेकांना बदलीतून वगळल्याने परतून जावे लागले. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. या बदल्यांसाठी रिक्त जागा दाखविताना अनेक शाळा विनाकारण ब्लॉक करून ठेवण्यात आल्या. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही पूर्वकल्पना न देता बदली इच्छुक शिक्षकांसहित शिक्षक संघटनांची फसवणूक केल्याची आमची धारणा आहे. याबाबत शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे. सभेत ठरल्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांकडून कार्यवाही न झाल्याने अत्यंत कमी प्रमाणात बदल्या झाल्या. सभेत ठरल्याप्रमाणे २०१९ मधील विस्थापित शिक्षक, अवघड क्षेत्रामधील शिक्षक, महिला शिक्षक तसेच अनेक वर्ष बदलीच्या प्रतीक्षेत असलेले बदली इच्छुक शिक्षकांना बदलीची संधी प्रशासनाने दिलेली नाही, असेच म्हणावे लागेल.
------
विकल्प न बदलता प्रक्रिया करा
२१ जून २०२३ च्या बदली आदेशाद्वारे दिलेली बदलीची संधी प्राप्त करून देण्यासाठी संघटनेच्यावतीने २१ मेच्या समुपदेशनातून विकल्प स्वीकारलेल्या शिक्षकांचे विकल्प न बदलता पुढील बदली प्रक्रिया करावी. बदली विस्थापित असूनही आजपर्यंत बदलीची कोणतीच संधी दिलेली नाही, अशा शिक्षकांची यादी करून त्यांना विनाअट प्राधान्याने बदलीची संधी द्यावी. पती-पत्नी, संवर्ग १ मधील शिक्षक व दुसऱ्या तालुक्यात सेवा करणारे बदली इच्छुक शिक्षक व अवघड क्षेत्रामधील शिक्षक यांना बदलीची संधी द्यावी. यावरील सर्वांसाठी सध्याच्या रिक्त जागा, आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांच्या जागा उपलब्ध करून देऊन स्वतंत्र समुपदेशन घेण्यात यावे. याद्वारे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया समाधानकारक पूर्ण करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या वतीने मागणी करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT