कोकण

-चिपळूण रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

CD

- ratchl३३.jpg-
P२४M८७५७६
चिपळूण ः रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण वेगाने सुरू आहे.
-----------------

चिपळूण रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

सुशोभीकरण वेगाने ; पाच कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः येथील रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट होत आहे.. येथील सुशोभीकरणाने वेग घेतला असून येत्या काही महिन्यांत चिपळूण रेल्वे स्थानकाला नवा साज मिळणार आहे. सध्या होणारी गैरसोय दूर होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील वालोपे रस्ता ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. याबाबत लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रवाशांमधून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात वाहने पार्किंग शेडची व्यवस्था नव्हती. तसेच प्रवाशांची गर्दी झाल्यास अथवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पाऊस, उन्हात उभे राहायचे म्हटले तर कोणतीही सोयी सुविधा नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत होते. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूणसह खेड रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार चिपळूण रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. सुशोभीकरणांतर्गत परिसराचे पहिल्या टप्प्यात कॉंक्रिटीकरण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात शेड पार्किंग, इलेक्ट्रिशियन, स्टोन पिचिंग आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

SCROLL FOR NEXT