कोकण

धनेश पक्षी संवर्धनासाठी राखीव वन संवर्धन गरजेचे

CD

- rat3p20.jpg
87529
दोडामार्ग : येथील संमेलनात सहभागी धनेशमित्र.

- rat3p21.jpg
87530
संमेलनातील धनेशाची ओळख सांगणारा फलक.

धनेशाच्या संवर्धनासाठी राखीव वन संवर्धन गरजेचे

प्रतीक मोरे ; दोडामार्ग येथे धनेशमित्र संमेलन, खासगी जागा घेण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : धनेश पक्षी संवर्धनासाठी काही राखीव वने ही संवर्धन राखीव किंवा कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून संवर्धित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अभ्यासक प्रतीक मोरे यांनी केले.
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे झालेल्या ''धनेशमित्र संमेलना''त ते बोलत होते. नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी देवरूख येथील सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, वानोशी फॉरेस्ट होम स्टेचे प्रवीण देसाई, देवराई फाऊंडेशनचे रघुनाथ ढोले, ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन''चे वन्यजीव संशोधक डॉ. रोहित नानिवडेकर, सृष्टीज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक प्रशांत शिंदे आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे डॉ. शार्दुल केळकर, पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर उपस्थित होते.
डॉ. रोहित नानिवडेकर यांनी भारतातील धनेश पक्षी संवर्धनाचा उहापोह केला. त्यानंतर धनेश पक्षी संशोधक पूजा पवार यांनी पश्चिम घाटातील धनेश पक्षी संशोधनाचा आढावा मांडला. धनेश पक्षी संवर्धनासाठी अशा पद्धतीचे संमलेन होणे आवश्यक असून, त्यामधून वनविभागाला देखील संवर्धनाची दिशा मिळते, असे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले. यावेळी स्थानिकांनी धनेशाला असलेल्या धोक्यांची यादी तयार केली. धनेशाच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी खासगी जागा मालकांनी पुढे येण्याची गरज असून, त्याठिकाणी आपण वनीकरणाचा प्रयोग करून अधिवासाचे पुनरुज्जीवन करू शकतो, असे नानिवडेकर यांनी सांगितले. या सत्राअंती प्रतीक मोरे म्हणाले, धनेश पक्षी संवर्धनासाठी काही राखीव वने ही संवर्धन राखीव किंवा कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून संवर्धित करणे गरजेचे आहे.
-------
चौकट
धनेशमित्रांचा सन्मान
धनेश पक्षी आणि इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्गमित्रांचा धनेशमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनश्री फाऊंडेशन, प्रवीण सातोसकर, प्रवीण देसाई, विशाल सडेकर, पराग रांगणेकर, भाग्यश्री परब, महादेव (काका) भिसे, गजानन शेटये, राहुल ठाकूर, वाईल्डवन तिलारी, मिलिंद पाटील यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT