कोकण

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

CD

डंपरच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार
खेडः मुंबई-गोवा महामार्गावरील पीरलोटे चिरणी मार्गावर डंपरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात २ जूनला झाला. या प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण मनोहर वेळवी (वय ४२, सध्या रा. चिरणी) असे मृत स्वाराचे नाव आहे. या प्रकरणी महेश मनोहर वेळवी (३८, रा. चिरणी) यांनी तक्रार दाखल केली असून डंपरचालक चंदू दौडामणी (रा. वालोपे, चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण मनोहर वेळवी (४२) हे दुचाकीने (एमएच-१२-जेबी-८९२८) पीर लोटे ते लोटे गावठाणवाडी असे जात होते. त्यावेळी चिरणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निवाचा कडेजवळ डंपरने (एमएच-०८-एपी-१७०७) लक्ष्मण याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात त्याच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी डंपरवरील चालक चंदु दौडामणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------
खेडमध्ये हातभट्टीच्या
दारूधंद्यावर धाड
खेडः शहरातील नगरपालिका कर्मचारी वसाहतीच्या पाठीमागे एका झाडाखाली बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत ३ हजार ४२० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सिद्धेश वैभव खामकर याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MS Dhoni च नाही तर कोलकाता नाईट रायडर्सच्या 'या' तीन खेळाडूंसाठी यंदा शेवटचं आयपीएल?

नवी मुंबई एअरपोर्टचा मोठा धमाका! ४६ नव्या शहरांसाठी उड्डाणांची घोषणा; उन्हाळी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या मार्ग...

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Narayangaon News : मोफत शस्त्रक्रियेमुळे शेतमजूर तरुण विवाहितेचे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमय

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाणारच! ड्यू प्लेसिस ते इरफान पठाण, १२ एक्सपर्टची भविष्यवाणी; तुमचे टॉप ४ कोणते?

SCROLL FOR NEXT